लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन क्रिडा स्पर्धेच्या उद्घाटनाच्या बॅडमिंटन स्पर्धेत मुलांच्या एकेरी आणि डबलमध्ये एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंग संघाने तर महिलांच्या एकेरी आणि डबलमध्ये एमआयटी स्कूल ऑफ अर्किटेक्चरच्या संघाने प्रतिस्पर्धी संघांना पराभूत करत बाजी मारली.
एमआयटी एडीटी विद्यापीठातर्फे आयोजित आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेचे उद्घाटन नुकतेच एमआयटी मिटकॉमच्या संचालिका डॉ. सुनीता मंगेश कराड, विद्यार्थी विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र पुजेरी आणि क्रिडा विभागाचे प्रमुख पद्माकर फड यांच्या हस्ते करण्यात आले.
विद्यापीठातर्फे खेळविण्यात आलेल्या बॅडमिंटन स्पर्धेत एमआयटी एसओई संघाने एमआयटी आंतरराष्ट्रीय स्कूल ऑफ ब्रॉडकॅस्टिंग आणि जर्नालिझम संघाला 21-12-21-17 असा सरळ सेटमध्ये पराभूत करत विजय संपादन केला. तसेच महिलांच्या एमआयटी स्कूल ऑफ अर्किटेक्चरच्या संघाने एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्ट संघाला 21-15, 18-21,21-14 अशा तीन सेटमध्ये पराभूत करत विजय मिळवला.
तसेच पुरुषाच्या दुसऱ्या सामन्यात एमआयटी एसओएफटी संघाने एमआयटी एसव्हीएस संघाचा 21-19, 18-21, 21-15 असी तीन सेटमध्ये पराभव केला. तसेच महिलांच्या दुसऱ्या सामन्यांमध्ये एमआयटी एसव्हीएस संघाने एमआयटी एसओईआर संघाचा दोन सेट 21-18,21-12 असा, तर एमआयटी एसओएफटी संघाने एमआयटी एसओएच संघाला सरळ दोन सेटमध्ये 21-19-,21-9 असा पराभव करत पुढच्या फेरीत प्रवेश केला.
एमआयटी एडीटी विद्यापीठात आंतरमहाविद्यालय स्पर्धेत क्रिकेट, फुटबॉल (पुरुष-महिला) कब्बडी (पुरुष), बॉस्केटबॉल (पुरुष-महिला), बॅटमिंटन (पुरुष-महिला), टेबल टेनिस (पुरुष-महिला), टेनिस (पुरुष-महिला), वाटरपोलो (पुरुष), बुद्धीबळ (पुरुष-महिला), जलतरण (पुरुष-महिला), रोईंग (पुरुष-महिला), बॉक्सिंग (पुरुष-महिला), शरीरौष्टी (पुरुष) या खेळ प्रकार विविध स्पर्धा होणार आहे.
एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेमधून राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार करण्यासाठी वातावरण निर्मिती केली जात असल्याची भावना उद्घाटन प्रसंगी एमआयटी मिटकॉमच्या संचालिक डॉ. सुनीता कराड यांनी व्यक्त केली.