राहुलकुमार अवचट
यवत – दौंड तालुक्यातील पश्चिम भागातील जावजीबुवाची वाडी ( कासुर्डी ) येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मधील २१ गुणवंत विदयार्थ्यांना आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याबरोबरच जिल्हा परिषद शाळेतील १२० विध्यार्थ्यांना शिक्षणामध्ये प्रोत्साहन या उद्देशाने शालेय साहित्य वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांशी हितगुज करताना आनंदी जीवन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ.मोहसीन पठाण यांनी सांगितले की, मी स्वतः एक डॉक्टर आहे. परंतु, विदयार्थी ते डॉक्टर हा माझा प्रवास खूप खडतर असून मी अनेक संकटांचा सामना करत आज या उंची पर्यंत पोहचलो आहे. माझे शिक्षण पूर्ण करणेसाठी खूप लोकांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
परिस्थितीमुळे कोणाचे ही शिक्षण अर्धवट राहू नये,सर्वांना उच्चशिक्षण मिळावे,आपली सामाजिक बांधिलकी टिकून राहावी. म्हणून आम्ही काही मित्रांनी एकत्रित येत आनंदी जीवन फाउंडेशन या नावाने संस्था चालू केली असून आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही लवकरच ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
आपली स्वप्न पूर्ण करणेसाठी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्र निर्माण करण्याचे मानस आहे. तसेच जेष्ठ नागरिकांसाठी लवकरच वृद्धाश्रम देखील चालू होत आहे