लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ लोणी काळभोर (ता. हवेली) येथे स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधुन मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विद्यापीठाचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला.
या स्पर्धेत अर्थव काळभोर याने प्रथम, सौरभ घोरपडे द्वित्तीय तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक मार्गारेट थापा तर द्वित्तीय कल्पना विश्वकर्मा यांनी कर्मचारी गटात बक्षीस मिळाले. मैत्रयी बिरासदार हिने प्रथम तर वंदना शैलेश हिने विद्यार्थी गटात बक्षीस मिळवले.
दरम्यान, मकर संक्रांतीच्या निमित्ताने विद्यापीठात पंतग महोत्सव आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यीनी शेकडो पतंग उडविण्याचा आनंद घेतला. महोत्सव पर्यावरणपूरक असून परिसरामधील पशू, पक्षी यांना कोणतीही हानी अथवा इजा होणार नाही याची संपूर्ण खबरदारी व दक्षता घेण्यात आली होती. प्रतिबंध करण्यात आलेल्या कोणत्याही प्रकारच्या मांज्याचा महोत्सवामध्ये वापर करण्यात आला नाही.
हा महोत्सव प्रथमच आयोजित होत असून महोत्सवामध्ये बिन मांज्याचे पतंग, ड्रोन पतंगबाजी ही प्रमुख वैशिष्ट्ये होते, असे मत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी व्यक्त केले.
यावेळी डॉ. महेश चोपडे, डॉ. रमाकांत कपले, डॉ. किशोर रवांदे, डॉ. अतुल पाटील, प्रा. पद्माकर फड, डॉ. ज्ञानदेव निलवर्ण, डॉ. अमोल अटले यांच्या अन्य मान्यवर उपस्थित होते.