युनूस तांबोळी
शिरूर : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, आपल्या भाषेचा आपण आदर करुन तिचा गौरव वाढविण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्नशील असले पाहिजे, असे मत मुख्याध्यापिका स्वाती थोरात यांनी व्यक्त केले.
आमदाबाद (ता. शिरूर) येथील पांडुरंगआण्णा थोरात माध्यमिक विद्यालयात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.
मराठी राजभाषा गौरव निमित्ताने प्रशालेत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी सभेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका स्वाती थोरात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त विद्यालयाच्या वतीने काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मराठी विभाग प्रमुख रोहिदास पोटे यांनी “घर कौलारू” व “बाप”या कविता सादर केल्या. याप्रसंगी राहुल शिंदे, विलास पोंटे, विष्णू दासीमे, वैशाली कोरडे, शरद येवले, महेश कारकूड आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शिक्षकांनी मराठी दिनाबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भाग्यश्री घुले यांनी केले. आभार रिया देव्हाडे यांनी मानले.