उरुळी कांचन, (पुणे) : ग्रामीण भागातील महिलांमध्येही खूप काही कला दडलेल्या आहेत. त्या विकसित करणे महत्त्वाचे आहे. त्यातच मणिभाई देसाई महाविद्यालयाने अशाच मुली व महिलांच्या कलागुणांना नेहमीच वाव देण्याचे काम केले आहे, असे प्रतिपादन व्याख्यात्या मीनाक्षी गिरमे यांनी केले.
उरुळी कांचन, (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयात महिला समन्वय कक्ष, राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने व महिला दिनाच्या निमित्ताने ‘विद्यार्थिनींना डिजिटल सहेली’ या विषयांतर्गत विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गिरमे बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अविनाश बोरकर हे होते.
यापुढे बोलताना गिरमे म्हणाल्या, ‘महिला चूल आणि मूल यातून बाहेर पडून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. प्रत्येक क्षेत्रात मुली या कमी नाहीत हे पुरुषांना दाखवून दिले पाहिजे. तसेच वैवाहिक जीवन हे धर्मानुसार जागून टिकवले पाहिजे व वृद्ध सासू सासऱ्यांची सेवा ही आई वडील म्हणून करावी.’
या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत यांनी केले. तर या कार्यक्रमाला विद्यार्थी विकास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. अमोल बोत्रे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा. रवींद्र मुंढे प्रा. डॉ. समीर आबनावे प्राध्यापक विजय कानकाटे, अनुप्रीता भोर, अंजली शिंदे, वैशाली चौधरी, श्रेया चव्हाण, सारिका ढोंनगे, वंदना प्रजापती, रोशनी सुंदराणी व प्रा. कल्पना जराड हे उपस्थित होते.
दरम्यान, विशेष सहकार्य कार्यालयीन अधीक्षक प्रदीप राजपूत मयुरेश्वर बगाडे आणि विशाल महाडिक यांचे लाभले. कार्यक्रमाचे स्वागत विद्यार्थिनी प्रतीक्षा मुल्या हिने केले. प्रास्ताविक महिला समन्वय प्राध्यापक सुजाता गायकवाड यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी रानवडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. कमरून्नीसा शेख यांनी केले.