उरुळी कांचन : सतरा वर्षांपूर्वी शिकत असलेले माजी विद्यार्थी, तीच शाळा, तेच विद्यार्थी, निमित्त होते सस्नेह मेळाव्याचे, उरुळी कांचन (ता. हवेली) येथील महात्मा गांधी महाविद्यालतील २००५ सालच्या माजी विद्यार्थ्यांचा इयत्ता दहावीतील माजी विद्यार्थ्यांचा सस्नेह मेळावा आनंदात आणि थाटामाटात संपन्न झाला. यावेळी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडत जुन्या आठवणींना उजाळा दिला.
उरुळी कांचन येथील महात्मा गांधी महाविद्यालत सन २००४-२००५ साली दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी नुकतेच स्नेह्मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय काळातील आठवणींना उजाळा देत गुरूजनांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली. या स्नेहमेळाव्यात तब्बल ३०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला आहे.
विद्यार्थी शाळेतील जुन्या आठवणीमध्ये रमून गेले होते. त्याच बरोबर वर्तमान काळात शाळेविषयी श्रद्धा व्यक्त करीत होते. यावेळी विद्यार्थी शिक्षक यांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांनी सहभागी शिक्षकांचे आभार मानले आणि या कार्यक्रमाची स्नेह भोजनाने सांगता झाली.
दरम्यान, माजी विद्यार्थ्यांनी शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा संकुलासाठी काही देणगी स्वरूपात रक्कम संस्थेचे विद्यमान प्राचार्य भरत भोसले यांच्याकडे सुपूर्त केली.तसेच सामाजिक बांधिलकी जपून ज्ञानप्रबोधनी स्त्री – शक्ती प्रबोधन, पुणे ग्रामीण (हिरकणी प्रकल्प) व गड संवर्धनाचे कार्य करत असलेली सह्यादी प्रतिष्ठान कडे काही निधी सुपूर्त केला.
या स्नेहमेळाव्याचे आयोजन अनुप्रिता वैराट, यामिनी तुपे, मनाली बारवकर, रामेश्वरी कांचन, अश्विनी क्षीरसागर, प्रतिमा सुपणार, श्रद्धा क्षीरसागर, प्रज्ञा हिरवे, विद्या बधे, प्राजक्ता गायकवाड, मंजुश्री ननावरे, तृप्ती कोलते, कीर्ती कांचन, निलेश कांचन, सुधीर गायकवाड, गणेश कोलते, विशाल जावळे, संतोष चौधरी, प्रफुल्ल मुखवटे, नितीन जोशी, जितेंद्र बडेकर , किसन टिळेकर,अविनाश तुपे, योगेश टिळेकर, मोरेश्वर बगाडे, जीवन आतकिरे यांनी केले होते.