-संतोष पवार
पळसदेव : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा -TET (टीईटी) आयोजित केली जाणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने राज्यातील 36 जिल्ह्यात टीईटी परीक्षा आयोजित केली जाणार आहे. सदर परीक्षेचे प्रवेशपत्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे . 10 नोव्हेंबर रोजी 10.30 ते दुपारी 1.00 या वेळेत टीईटी परीक्षेचा पेपर क्रमांक एक, तर दुसरा पेपर 2.30 ते 5.00 या वेळेत आयोजित केलेला आहे. ऑफलाइन पद्धतीने होणाऱ्या टीईटी परीक्षेसंदर्भात राज्यातील शिक्षणाधिकारी विविध केंद्रप्रमुखांच्या बैठका आयोजन करून राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून परीक्षेचे सर्व नियोजन करण्यात आले आहे.
टीईटी परीक्षेसाठी प्रविष्ठ होणाऱ्या उमेदवारांचे प्रवेशपत्र राज्य परीक्षा परिषदेच्या Mahatet.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. उमेदवारांनी 28 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2024 या कालावधीत संबंधित प्रवेशपत्र डाउनलोड करून घ्यावे .