सुरेश घाडगे
परंडा : तालुक्यातील कुंभेफळ येथील अंगणवाडीच्या वर्ग खोलीची दुरावस्था झालेली आहे. दुरुस्तीसाठी मनसेच्या वतीने परंडा गटविकास अधिकारी यांना ( दि. ११ ) निवेदन दिले आहे. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष शाबीर शेख ,जिल्हा उपाध्यक्ष बापूसाहेब क्षीरसागर, रोहिदास मारकड, किशोर गायकवाड, शहर अध्यक्ष अरुण खडके,सचिव मधुकर ठोसर, योगेश आवाळे, रियाज शेख, तात्यासाहेब हजारे,बाबुल शेख उपस्थित होते .
या निवेदनात म्हटले आहे कि, या वर्ग खोलीचे दरवाजे तुटलेले आहेत. छताचे पत्रे फुटलेले असून खिडक्या फरशी तुटलेली आहे. पर्यायी व्यवस्था म्हणून तलाठी सज्जा असलेली रिकामी खोलीमधे अंगणवाडी भरविली जाते. परंतु, त्या हि खोलीची दुर्दशा अतिशय बिकट झालेली आहे.
वर्गखोलीच्या पाठीमागे मोकळ्या जागेत गवत वाढल्याने मोठ मोठ्या विषारी सापांचा वावर तिथे असतो. त्याच बाजूला या खोलीची मोडकी खिडकी आहे. त्यामधून खोलीमध्ये सापा सारखे विषारी प्राणी आतमधे येण्याची भीती आहे. फरशी खाली मोठमोठे भेगा पडलेल्या आहेत.
दरम्यान, या अंगणवाडीच्या दुरावस्थेकडे सरपंच व ग्रामसेवक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काही दुर्दैवी घटना घडल्यास यास सरपंच व ग्रामसेवक हे जबाबदार असतील. त्वरित दुरुस्तीसाठी कार्यवाही करावी अन्यथा उपोषण करण्यात येईल. अशा इशारा मनसेने दिला आहे.