पुणे : यंदा जुलै सत्रात झालेल्या JEE Main परीक्षेचा दुसर्या सत्राचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षा 25 जुलै ते 30 जुलै दरम्यान घेण्यात आल्या आहेत.
हा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना त्यांचा अॅप्लिकेशन नंबर आणि जन्म तारखेची गरज आहे. BE, B Tech (Paper 1) आणि B Arch, B Planning (Paper 2) परीक्षांचा निकाल जाहीर झाला आहे.अधिकृत वेबसाईट jeemain.nta.nic.in वर निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
IITs मध्ये प्रवेशासाठी यंदा JEE Advanced या पुढील टप्प्यातील परीक्षेला 2.5 लाख विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकणार आहेत. JEE Advanced ची अर्ज प्रक्रिया 7 ऑगस्ट 2022 पासून सुरू झाली असून 28 ऑगस्टला त्यासाठी परीक्षा घेतली जाणार आहे.
जेईई मेन्स निकालामध्ये एनटीए कडून विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल गुण दाखवण्यात आले आहेत. तसेच देशातील रॅन्क जाहीर करण्यात आला आहे. या निकालावर त्यांची JEE Advanced 2022 ची पात्रता ठरते.
असा पाहा निकाल?
NTA JEE Main वेबसाईट jeemain.nta.nic.in ला भेट द्या.
त्यानंतर स्क्रोल डाऊन करून ‘Candidate Activity’ section मध्ये जा.
JEE Main result link वर क्लिक करा.
आता पुढील विंडो मध्ये जेईई मेन्स अॅप्लिकेशन नंबर टाका तुमची जन्मतारीख टाका.
तुमचं जेईई मेन्स 2022 च्या निकालाची प्रत आता तुम्ही डाऊनलोड करू शकता.
एनटीए कडून निकाल डाऊनलोड करण्यासाठी 2 लिंक्स उपलब्ध करून दिल्या आहेत. काही दिवसांपूर्वी JEE Main Paper 1 आणि Paper 2 answer key जारी करण्यात आली होती.
ऑब्जेक्शन्स देण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता हा निकाल जारी झाला आहे.