राहुलकुमार अवचट
यवत : बोरीऐंदी येथील जेक अँड केली या शाळेचे स्नेह संमेलन प्रशालेच्या मैदानात संपन्न झाले. लहान व मोठ्या गटाच्या मुलांनी केलेलं सदरीकरण पाहून पालक व गावकरी आनंदित झाले.
या कार्यक्रमाचे उदघाटन उरुळी कांचनचे माजी सरपंच, तरुण उद्योजक सागर पोपट कांचनपाटील यांनी केले.
यावेळी सरपंच जीवन पवार, राजेंद्र तावरे, गणेश दौंडकर, ग्रामपंचायत सदस्य समीर गोठे, अमोल शेलार, प्रताप तावरे, सुनील टिळेकर , मच्छिंद्र दरेकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी सागर कांचन म्हणाले, लहान मुले अशा कार्यक्रमात मनमुराद नाचतात, याचा आनंद वाटतो. या मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव दिल्याने कार्यक्रम सुखकर होतो.
कार्यक्रमाचे प्रास्तविक भाषणात माजी सरपंच व जेष्ठ पत्रकार एम. जी. शेलार यांनी केले. लहान मुले कोणतेही दडपण न ठेवता कार्यक्रमात भाग घेतात ही कौतुकाची बाब आहे या लहान बालकांना सर्वांनी सहकार्य करणे हे आपले कर्तव्य आहे.
शाळेच्या मुख्याध्यापिका कावेरी वेताळ यांनी अतिशय सुरेख गीतांची निवड करून मुलांकडून नृत्य करून घेतल्याने त्यांचे देखील कौतून ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेखा मगर, तृप्ती म्हस्के यांनी केले. मुलांचे नृत्य पाहून उपस्थित पालक व ग्रामस्थांनी ३८८७५ रुपयांची रोख बक्षिसे दिली. तसेच कार्यक्रमासाठी मंडप व्यवस्था रोहिदास गायकवाड यांनी मोफत उपलब्ध करून दिली. सर्वांनी दिलेल्या प्रतिसादासाठी मुख्याध्यापिका कावेरी वेताळ यांनी सर्वांचे आभार मानले.