लोणी काळभोर : भारतीय विद्यार्थ्यांमध्ये संशोधन आणि इनोव्हेशनसाठी आवश्यक क्षमता आहेत, मात्र त्यांना आवश्यक पायाभूत सुविधांची कमतरता भासत आहे. हेच विद्यार्थी परदेशात जाऊन जगतिक दर्जाचे संशोधन करतात, हेच संशोधन भारतात व्हावे, यासाठी खासगी आणि सरकारी यंत्रणांनी मिळून पायाभूत सुविधांसाठी आवश्यक कार्य करावे, असे आवाहन नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, पुणेचे संचालक डॉ. मोहन वाणी यांनी केले.
एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या एमआयटी स्कूल ऑफ बायो-इंजिनियरिंग सायन्सेस आणि रिसर्च तर्फे “बायोइंजिनिअरिंग मधील अलिकडील ट्रेंड” या विषयावरील ६वी आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी युनिव्हर्सिटी कॉलेज डब्लिन, आयर्लंडचे प्रो. जेरेमी सिम्पसन, श्री. जस्टीन डॉवल्स, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजिनियरिंग सायन्सेस अँड रिसर्चचे संचालक प्रो. विनायक घैसास, डॉ. रेणू व्यास आदी उपस्थित होते.
डॉ. मोहन वाणी म्हणाले, एमआयटी एडीटी विद्यापीठाने उत्कृष्ट संशोधक आणि यशस्वी उद्योजक तयार करण्याचे कार्य करत आहे. तंत्रज्ञानाच्या दृष्टीने संशोधन महत्वाचे आहे. बायोइंजीनिअरिंगमधील संशोधनाला आवश्यक शैक्षणिक वातावरणाची गरज असते. आताच्या काळात बायोइंजीनिअरिंग का महत्वाचे आहे, तर कैन्सरसारख्या आजारावर ही उपया शोधण्याचे कार्य या विद्याशाखेने केले आहे.
बायोइंजिनीअरिंग तंत्रज्ञानाच्या माध्यमातून कैन्सर संबंधी सेल मारण्यात महत्वाची भूमिका बजावतात. संशोधऩात्मक लॅबना फंड मिळत नसल्याने संशोधनाचे कार्य कमी होत आहे, मात्र खासगी विद्यापीठामार्फत संशोधनाच्या प्रयोगशाळांना आर्थिक मदत मिळत असल्याने संशोधऩाचे कार्य जोरात सुरू आहे. विद्यार्थ्यांना कोरोनानंतर अनेक संधी निर्माण झाल्या आहेत.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, देशातील सर्वच विद्यापीठाने संशोधनासाठी आणि तंत्रज्ञानातील नवीन ट्रेंडवर आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद घ्यावी. बायोइंजीनिअरिंगमधील ट्रेंडवर भारतातील प्रत्येक विद्यापीठात चर्चा व्हावी. संशोधन आणि इनोव्हेशन हे कोणत्याही देशाच्या अर्थव्यवस्थेला चालविण्यासाठीचे चालक असतात. रिसर्च आणि इनोव्हेशनमुळेच देशाची अर्थव्यवस्था मजबूत होत असते.
अमेरिका, जपान, जर्मनी आणि इतर संशोधऩातील प्रमुख देशासारखी संशोधनासाठी व्यवस्था आपल्याकडे असावी, तर आपली अर्थव्यवस्था वाढेल. मॅकिंग इंडियासारख्या योजनांच्या माध्यमातून संशोधन आणि इनोव्हेशन अधिक वातावरण करावे. विद्यापीठामध्ये संशोधनाचे वातावरण असावे. आम्ही त्या मार्गाने मार्गक्रम करत आहोत. रिसर्चमधील आमचे काम मोठे आहे.
डॉ. विनायक घैसास म्हणाले, कोविड –१९ नंतर संशोधनावरील कार्य काही प्रमाणात थांबले होते, मात्र ते आता सुरू झाले आहे. आमच्या स्कूलमध्ये संशोधनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरील वातावरण तयार करण्य़ाचा प्रयत्न आहे. जागतिक दर्जाचे संशोधनात्मक शिक्षण येथे उपलब्ध करून देत आहोत. स्मार्ट मटेरियल तयार करण्याची गरज आहे. या परिषदेने तरुण विद्यार्थ्यांना आणि इच्छुक संशोधकांना जैव अभियांत्रिकी क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अनेक दिग्गजांशी संवाद साधण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
दरम्यान, कोविड – १९ नंतर होणाऱ्या या परिषदेत भारत आणि परदेशातील संशोधनावरील १०० हून अधिक संशोधन पेपर आले आहे. यातील काही निवडक प्रस्तावांची बायोइंजिनियरिंग आणि बायोटेक्नॉलॉजीमधील फ्रंटियर्सच्या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रकाशित केले जाईल. युवा संशोधकांचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ आणि उद्योग व्यावसायिकांकडून मूल्यमापन करण्यात आले आणि त्यांच्या पोस्टर आणि मौखिक सादरीकरणासाठी त्यांना बक्षिसे देण्यात आली.