राहुलकुमार अवचट
यवत – बोरीऐंदी (ता. दौंड) येथील फुलोरा ग्रंथालय व वाचनालय यांच्या वतीने “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ” व ग्रंथ प्रदर्शन आयोजन कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच जीवन पवार तर दीप प्रज्वलन वि.का. संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र तावरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांनी राज्याची राज्य भाषा मराठी असलेल्या मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. आणि मराठी भाषेचे संवर्धन व्हावे. या हेतूने जिल्ह्यातील सर्व शासकीय ग्रंथालय, ग्रामपंचायत ग्रंथालय सह सर्वच ग्रंथालयांनी ” मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ” पाळावा असा आदेश दिले आहेत. त्यानुसार हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.
फुलोरा वाचनालय हे ग्रामीण भागातील दर्जेदार वाचनालय असून येथे बरा हजार पुस्तके, यासह स्कॉलरशिप ते स्पर्धा परीक्षांची सर्व पुस्तके उपलब्ध केली आहेत, कथा, कादंबरी, कविता, वाड्मय, वृत्तपत्रे असे वाचनीय साहित्य उपलब्ध आहे.
राज्याची राज्य भाषा मराठी असून या भाषेच्या संवर्धनासाठी आपण सर्वांनीच प्रयत्न करणे आपले कर्तव्य असल्याचे मत ज्येष्ठ पत्रकार एम.जी. शेलार यांनी व्यक्त केले. विद्यार्थी व गावातील नागरिकांनी या पंधरवड्यात जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आव्हान देखील त्यांनी केले ग्रंथालय प्रशासन मार्फत वाचन संस्कृती व अन्य उपक्रम सतत सुरू असतात.
यावेळी ग्रामविस्तार अधिकारी प्रकाश जाधव, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सोमनाथ गायकवाड, रामदास भगवान गायकवाड, फुलोरा वाचनालयाचे संस्थापक दादा दरेकर, माजी सैनिक नानासाहेब गायकवाड, सुरेश दौंडकर, सचिन दौंडकर, राजेंद्र भारती, अनिल शेंडकर, विवेक दौंडकर, बबन भोसेकर, शिवराम बापू कुदळे हायस्कुलचे शिक्षक मंगेश कुलकर्णी, ग्रंथपाल मच्छिंद्र दरेकर, प्राथमिक व माध्यमिक शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते