उरुळी कांचन, (पुणे) : अष्टापूर (ता. हवेली) गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये कायमस्वरुपी शिक्षक शुक्रवार (ता. ०९) पर्यत न दिल्यास शाळेतील विद्यार्थी पुणे जिल्हा परिषद येथे सोडणार असल्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कोतवाल यांनी दिला आहे. मुलांच्या शौक्षणिक नुकसानीस जबादारी प्रशासनाने घ्यावी व जोपर्यंत शाळेला शिक्षक उपलब्ध होत नाहीत तोपर्यंत शाळेला कुलूप ठोकण्याचा इशाराही व्यवस्थापन समितीने दिला आहे.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अष्टापूर येथे इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शाळा आहे. या शाळेमध्ये १३० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ऑगस्ट २०२१ मध्ये एक शिक्षिका पदवीधर पदोन्नतीने बदली झाली. तेव्हापासून या शाळेचा कारभार हा एक शिक्षक व मुख्याध्यापक यांच्यावर सुरु आहे.
मागील जून महिन्यापासून माजी पंचायत समिती सदस्य सुभाष जगताप, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कोतवाल, यांनी वारंवार गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी, यांना वारंवार हि माहिती दिली होती. तसेच शाळा बंद करण्याचा इशारा देण्यात आला होता. तेव्हा तात्पुरत्या स्वरूपात एका शिक्षकाची नेमणूक करण्यात आली होती.
शाळेची ऑनलाईन माहिती, मिट्टीग इतर कामामुळे शिक्षक अपुरे पडत आहेत. तसेच इंग्लिश मिडीयम शाळेतील ५० नवीन विद्यार्थी शाळेत आले आहेत. शाळेच्या भौतिक गरजा या ग्रामस्थांच्या व पालकांच्या मदतीने पूर्ण झाल्या आहेत. मुलांचे शौक्षनिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशासनाने कायमस्वरूपी आणखी दोन शिक्षक द्यावेत अशी मागणी करण्यात येत आहे.
दरम्यान, शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनीही याबाबत प्रयत्न केले मात्र संबंधित विभागहि आमदारांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शुक्रवारपर्यत शिक्षक न दिल्यास शाळेतील विद्यार्थी जिल्हा परिषदला सोडण्याचा इशारा शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किरण कोतवाल यांनी दिला आहे.
याबाबत हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्याशी संपर्क साधला असता शिर्के म्हणाले, “अष्टापूर जिल्हा परिषद शाळेत पुढील दोन दिवसात कोणत्याही परिस्थितीत शिक्षकाची सोय केली जाणार आहे. ग्रामस्थांनी याबबत माझ्याकडे संपर्क केला होता. पुढील दोन दिवसात शिक्षक दिला जाणार असल्याने नागरिकांनी संयम ठेवावा.”