पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) २५ टक्के आरक्षित जागांवरील प्रवेशप्रक्रिया प्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गुरुवार, ११ जुलै रोजी अंतिम सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या निर्णयाकडे पालकांचे लक्ष लागले आहे. शिक्षण विभागातर्फे आरटीई प्रवेशप्रक्रिया राबवली जात आहे. मात्र राज्य शासनाने आरटीई कायद्यात बदल केला. या बदलास आव्हान देणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली.
त्यावर न्यायालयाने आरटीई कायद्यात केलेल्या बदलाला स्थगिती दिली. त्यामुळे जुन्या पद्धतीने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. आरटीई प्रवेशासाठी राज्यातील ९ हजार २१७ शाळांमधील १ लाख ५ हजार ३९९ जागांवरील प्रवेशासाठी २ लाख ४२ हजार ९७२ अर्ज आले आहेत.