विशाल कदम
लोणी काळभोर : विद्यार्थी हा शाळेचा अविभाज्य घटक आहे. विद्यार्थ्याला शैक्षणिक व भौतिक सुविधा मिळाल्या पाहिजेत. नेस्ले इंडिया लिमिटेड मुंबई या कंपनीच्या वतीने लोणी काळभोरसह जिल्ह्यातील १२ शाळांना भौतिक सुविधा दिल्या आहेत.
त्यांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. असे मत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी मांडले
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील कन्या प्रशाला येथे स्वच्छतागृह हस्तांतरण सोहळा आज मंगळवारी (ता.१५) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पार पडला. या कार्यक्रमाचे उद्घाटन आयुष प्रसाद यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी ते बोलत होते. यावेळी शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी उर्फ युगंधर काळभोर, लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, साधना सहकारी बँकेचे ज्येष्ठ संचालक सुभाष काळभोर आदी मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना आता शैक्षणिक व भौतिक सुविधा मिळाल्या असून त्यांनी या सुविधांचा वापर करावा. विद्यार्थयांनी शाळेत १०० टक्के हजेरी जेणेकरून शाळेचा निकाल देखील १०० टक्के लागू शकेल.
विद्याथ्यांनीही निसंकोचपणे आपल्या अडचणी शिक्षकांना सांगाव्यात. तसेच शिक्षकांनी देखील शाळेचा शैक्षणिक अभ्यासक्रम शिकवून पूर्ण कराव, अशा सूचनाही प्रसाद यांनी दिल्या.
दरम्यान, कन्या शाळेच्या रस्ता सुरक्षा गस्त (RSP) च्या विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांचे स्वागत केले. लोणी काळभोर येथील कन्या शाळेला मुंबई येथील नेस्ले इंडिया लिमिटेड या कंपनीच्या वतीने आठ स्वच्छतागृहे देण्यात आली आहे.
यावेळी कंपनीचे अधिकारी संदेश सावंत, संदीप जीवाने, अमित चौधरी, अमित तिवारी, दीपक राठोड आदी उपस्थित होते.
यावेळी माजी सरपंच राजाराम काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, माजी उपसरपंच ज्योती काळभोर, योगेश काळभोर, राजेंद्र काळभोर, पृथ्वीराज कपूर मेमरीवर हायस्कूलचे प्राचार्य एस एम गवळी, कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजूरके, बचत गटाच्या संगीता काळभोर,ग्रामपंचायत सदस्य नागेश काळभोर, अमित काळभोर, पोलीस कॉन्स्टेबल निलेश पवार, कन्या शाळेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कन्या शाळेच्या सहशिक्षिका प्रियंका पाटील यांनी केले.