उरुळी कांचन, (पुणे) : स्वत:चा कल ओळखून माहिती तंत्रज्ञान विषयातील कोणतेही योग्य क्षेत्र निवडले तर कोणत्याही क्षेत्रात उत्तम करियर बनवू शकतो असे प्रतिपादन प्रा. नंदकिशोर मेटे यांनी केले. त्यामध्ये वेबसाईट डिझाईन, प्रोग्रामिंग, जावा, ग्राफिक्स, डेटाबेस, सुरक्षा, डेटा सायन्स या विषयांबद्दलहि मार्गदर्शन केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील प्लेसमेंट सेल आणि शास्त्र विभाग यांचा संयुक्त विद्यमाने आय.टी. विषयातील संधी बाबत प्रा. नंदकिशोर मेटे यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विविध संधी या विषयावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी वरील विधान मेटे यांनी केले. यामध्ये महाविद्यालयातील ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.
यावेळी प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत यांनी विद्यार्थ्यांना विज्ञान म्हणजे शिस्तबद्ध कार्यप्रणाली असून त्यास तंत्रज्ञानाची जोड देवून सर्वांगीण विकास कसा साधावा या बदल मार्गदर्शन केले. तसेच विद्यार्थ्यांनी सतत स्वत:ला अद्ययावत ठेऊन सॉफ्टवेर प्रकल्प तयार करावेत असा सल्ला दिला. महाविद्यालयाचे उप-प्राचार्य डॉ. अविनाश बोरकर यांनी विद्यार्थ्यांना उपयोजित व मुलभूत विज्ञान तसेच बी. एस्सी. विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी या बद्दल मार्गदर्शन केले.
दरम्यान, या कार्यक्रमाला प्राध्यापक प्रणिता फडके, रोहिणी शिंदे, दिपाली चौधरी, प्रतीक्षा कोद्रे, प्रसिद्धी विभाग प्रमुख विजय कानकाटे व कार्यालय अधिक्षक प्रदीप रजपूत यांनी सहकार्य केले. तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अनुजा झाटे यांनी केले प्रास्ताविक प्रा. विद्या लाळगे यांनी केले. तर आभार प्रा. स्वाती मासाळकर यांनी मानले.