अजित जगताप
वडूज : शिक्षणची कवाडे खुली करणारे महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्यामुळे खऱ्या अर्थाने चूल आणि मूल या संकल्पनेतून महिलांनी पुढे जाऊन शैक्षणिक क्रांती केली. आज त्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वडूज (ता. खटाव) येथील भिमाई महिला ग्रुपने महिलांच्या वतीने शिक्षण माता सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन केले.
भारतीय बौद्ध महासभेच्या राष्ट्रीय शिक्षिका जयश्री मस्के यांच्या निवासस्थानी भगवान गौतम बुद्ध, शिक्षण माता सावित्रीबाई फुले,महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
शिक्षण माता सावित्रीबाई यांच्या जीवन चरित्राबाबत पद्मावती होकळे, रेखा डावरे, सावली गायकवाड, मायावती गायकवाड, सुजाता कांबळे,चंद्रकला शिरसट, सीमा सावंत, अस्मिता गायकवाड, उमा झेंडे या महिलांनी मनोगत व्यक्त केले. तर उर्मिला झेंडे, सुरेखा कांबळे, इशांत झेंडे, सविता कमाने, सुजाता म्हस्के आदि महिला कार्यकर्त्यानी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शोभा वाढवली तसेच त्यांनी उपयुक्त माहिती दिली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विमल नलवडे होत्या. सदर कार्यक्रमासाठी वडूज नगरीतील सामाजिक कार्यामध्ये सहभाग घेऊन विविध उपक्रम राबवणाऱ्या महिला कार्यकर्त्या आदी मान्यवर उपस्थित होत्या. प्रारंभी कविता वाघमारे यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त पोस्टमास्तर उत्तम मस्के,सुधाकर शिलवंत, प्राध्यापक हणमंत डावरे,प्राध्यापक अजित कांबळे, पत्रकार अजित जगताप सामाजिक कार्यकर्ते अजित कंठे व भिमराव कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.