पुणे : सरकारी नोकरी मिळावी, यासाठी अनेकांचा प्रयत्न असतो. त्यात काहींना यश मिळते तर काहींना प्रतिक्षाच करावी लागते. पण तुम्ही देखील नोकरीच्या शोधात आहात? तर तुमचा हा शोध आता संपण्याची शक्यता आहे. कारण, पुणे जिल्हा शिक्षण मंडळात रिक्त पदांवर भरती केली जात आहे. त्यानुसार, पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळात रजिस्ट्रार, कायदा अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, संगणक प्रणाली, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता यांसह इतर अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु होत आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवाराला पुण्यात जाऊन नोकरी करावी लागणार आहे. या प्रक्रियेंतर्गत एकूण 17 रिक्त पदे भरली जाणार आहेत. संबंधित उमेदवाराची निवड ही मुलाखतीच्या माध्यमातून केली जाणार आहे.
यामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिक माहितीसाठी http://pdeapune.org/ या अधिकृत वेबसाईटवरून माहिती घेता येणार आहे.
अशी असेल भरती प्रक्रिया…
– पदाचे नाव : रजिस्ट्रार, कायदा अधिकारी, प्रशिक्षण आणि नियुक्ती अधिकारी, संगणक प्रणाली, संगणक हार्डवेअर आणि नेटवर्क अभियंता, डिजिटल स्टेडिओ ऑपरेटर आणि संपादक, सहायक लघुलेखक, लेखा लिपिक, लिपिक.
– एकूण रिक्त पदे : 17 पदे.
– नोकरीचे ठिकाण : पुणे.
– शैक्षणिक पात्रता : पदव्युत्तर पदवी, एलएलबी/एलएलएम, बी.ई/एम.ई, एमबीए, एम.सी.एस./एमसीए, बी.सी.एस/बी.सी.ए., पदवी/डिप्लोमा, पदवी, बी.कॉम/एम.कॉम.
– अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
– अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख : 25 जानेवारी 2024.
– अर्ज करण्याची शेवटची तारीख : 8 फेब्रुवारी 2024.