पुणे: वाघोली (ता.हवेली) येथील जी.एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड मॅनेजमेंटच्या तिसऱ्या वर्षाच्या संगणक अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांनी मिनिस्टरी ऑफ एज्युकेशन तर्फे इंटिग्रल युनिव्हर्सिटी, लखनौ येथे ओयोजित स्मार्ट इंडिया हॅकाथॉन (SIH) 2024 स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षिस जिंकले. टीम टेक सिंप-2 ला त्यांच्या इंडो-तिबेटियन बोर्डर पोलिसांच्या समस्या निवेदनावर “फेक सोशल मीडिया अकाउंट डिटेक्शन” हे नाविन्यपूर्ण उपाय सुचविले, यासाठी विद्यार्थ्यांना एक लाखाचे रोख रक्कम बक्षिस, पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
टीम टेक सिंप-2 सदस्यांमध्ये टीम लीडर सत्यम यादव, पुरू सिंग, ऋषभ कुकेजा, प्रतीक्षा पांडे, ज्योती पांडे आणि ध्रुव पाल यांचा समावेश होता. या टीमला प्रा. डॉ. सिद्धासेन आर. पाटील आणि प्रा. अपूर्वा पिल्ले यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेदरम्यान सतत मार्गदर्शन केले. संगणक अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सिमरन खियानी आणि इनोव्हेशन आणि इनक्युबेशन सेंटरचे प्रमुख डॉ. स्वप्निल महाजन यांच्या मार्गदर्शनालाखाली विद्यार्थ्य़ांनी समस्या निवड केली.
रायसोनी कॉलेज पुणेचे कॅम्पस डायरेक्टर डॉ. आर. डी. खराडकर यांनी सांगितले की, “हॅकाथॉन हे देशातील प्रतिभावंत विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण आणि वास्तविक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देते. आमचे लक्ष समावेशक विद्यार्थी विकासावर असायला हवे, ज्यामुळे नाविन्यपूर्णता समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचेल.
रायसोनी एज्युकेशनचे अध्यक्षश सुनील रायसोनी आणि रायसोनी एज्युकेशन कार्यकारी संचालक श्रेयस रायसोनी यांनी टीम टेक सिंप-2 च्या यशाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या प्रेरणादायक कामगिरीचे कौतुक केले.