उरुळी कांचन, (पुणे) : विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच शिक्षणाबरोबर समाजसेवेची जोड दिल्यास भावी जीवन यशस्वी होते. असे प्रतिपादन महात्मा गांधी सर्वोदय संघाचे उपाध्यक्ष के. डी. बापू कांचन यांनी केले.
भवरापूर (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व महात्मा गांधी सर्वोदय संघ संचलित राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत “युवकांचा ध्यास ग्राम व शहर विकास” यानुसार विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबीराचे आयोजन २८ डिसेंबर ते ०३ जानेवारी या दरम्यान करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असताना उपाध्यक्ष के. डी. बापू कांचन बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटन माजी पंचायत समिती सदस्य सुभाष आप्पा जगताप, भवरापूरचे सरपंच सचिन सातव, माजी सरपंच सुभाष साठे, बबनराव साठे, उपसरपंच संगिता गायकवाड ग्रामपंचायत सदस्य निलेश गायकवाड, जानकुबाई सातव, योगेश साठे, ग्रामसेविका भारती ताम्हाणे, एकनाथ ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
पंचायत समितीचे माजी सदस्य सुभाष जगताप म्हणाले, “स्वयंसेवकांना श्रम आणि संस्कार या दोन्ही गोष्टी एकत्रित करून आपण गावाचा विकास कसा साध्य करू शकतो तसेच तरुण मुलांनी व्यवसाय करावे पयशाने खचून न जाता ध्येय समोर ठेवून अविरत प्रयत्न करावे. इच्छाशक्तीला कठोर परिश्रमाची जोड दिल्यास कोणत्याही क्षेत्रात यश मिळवता येते.”
प्राचार्य डॉ. बाळासाहेब भगत म्हणाले, “मुलांनी विद्यापीठाच्या नियमानुसार सर्व गोष्टी पाळल्या पाहिजेत. लावलेली झाडे जोपासली पाहिजेत. लावण्यासाठी व कोणी सांगितले म्हणून झाड लावली नाही पाहिजेत तर लावलेली झाडे जोपासताहि आली पाहिजेत.” स्वयंसेवकांनी प्रथम मंदिर परिसर व शाळा परिसर स्वच्छ केला आणि ग्राम स्वच्छतेकडे पहिले पाऊल टाकले. व त्या नंतर कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. उद्योजक सुभाष साठे यांनी स्वयंसेवकांना उस्फुर्त पद्धतीचे मार्गदर्शन केले स्वयंसेवकांनी मंदिर परिसर स्वच्छ केल्याचे कौतुक केले.
दरम्यान, या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आधिकारी प्रा. डॉ. कमारून्नीसा शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. निलेश शितोळे यांनी केले. मान्यवरांचे स्वागत डॉ. बोत्रे अमोल यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम आधिकारी मुंढे रविंद्र यांनी केले. अनुप्रिता भोर प्रा. शुभांगी रानवडे, प्रा. उगाडे, शारीरिक शिक्षण संचालक करण जैन प्रा. बारवकर, प्रा. बारटक्के, प्रा. डॉ. समीर आबनावे प्रा. विजय कानकाटे प्रा. तोरवे तसेच मोरेश्वर बगाडे या सर्वांचे सहकार्य लाभले.