लोणी काळभोर : एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यीपीठाचा पाचवा दीक्षांत समारंभ बुधवारी दि. ९ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता तत्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर विश्वशांती प्रार्थना सभागृह आणि ग्रंथालय, विश्वराजबाग लोणी काळभोर येथे संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रोचे चेअरमन आणि अंतराळ विभाग दिल्लीचे सचिव डॉ. सोमनाथ एस, सन्माननीय अतिथी म्हणून भारतीय केमिकल सोसायटीचे अध्यक्ष पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा होणार असल्याची माहिती एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड, प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, की एमआयटी एडीटी विद्यापीठाने अमेरिकेतील सामा टेक्नॉलॉजीचे संस्थापक आणि सीईओ श्री. सुरेश काट्टा यांना डॉक्टरेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
एमआयटी आर्ट, डिझाइन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाची स्थापना 2015 साली झाली. या विद्यापीठाचा हा पाचवा दीक्षांत समारंभ आहे. विद्यापीठातर्फे 2021-2022 या शैक्षणिक वर्षात 16 विविध विद्याशाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्रासाठी पात्र असलेल्या 2315 विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. यात 45 विद्यार्थ्यांना सुवर्णपदक प्रदान करण्यात येणार आहे.
डॉ. अनंत चक्रदेव म्हणाले, एमआयटी स्कूल ऑफ डिझाइनचे 392, एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंटचे 226, महाराष्ट्र अकॉडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन ॲन्ड ट्रेनी (एमआयटी मॅनेट) चे 229, एमआयटी स्कूल ऑफ अर्किटेक्चर 29, एमआयटी स्कूल ऑफ फाईन आर्ट 105, एमआयटी स्कूल ऑफ एज्युकेशन अँड रिसर्च 45, एमआयटी आयएसबीजे 138, एमआयटी स्कूल ऑफ वैदिक सायन्स 53, एमआयटी फुड आणि टेक्नॉलॉजी 146, एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंग 760, एमआयटी स्कूल ऑफ बायोइंजीनिअरिंग सायन्स अँड रिसर्च 84 आणि एमआयटी संगीत कला अकादमीचे 21, एमआयटी स्कूल ऑफ ड्रामा 5, एमआयटी एसएफटी 23, एमआयटी फ्यूज 27, एमआयटी एसओएच 18, आणि पीएचडीचे 14 अशा एकूण 2315 विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. विद्यापीठातर्फे 14 विद्यार्थ्यांना पी.एचडी पदवी आणि 45 विद्यार्थ्यांना सुवर्णपदके ही प्रदान करण्यात येणार आहे.
यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे, पाचव्या दीक्षांत समारंभाचे प्रमुख डॉ. रामचंद्र पुजेरी आणि परीक्षा विभागाचे प्रमुख डॉ. ज्ञानदेव निलवर्ण आदी उपस्थित होते.