लहू चव्हाण
पाचगणी : धनगर समाजातील विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात पहिली ते पाचवी इंग्रजी माध्यमाच्या वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. यानुसार गणेश प्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट संचालित पाचगणी इंटरनॅशनल हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज (इंग्रजी माध्यम) पाचगणी या निवासी शाळेची निवड शासनाने केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करावेत असे आवाहन समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन उबाळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये केले आहे.
धनगर समाजाच्या (भटक्या जमाती -क) विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवी वर्गात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात प्रवेश देण्याची योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे राबविण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे विद्यार्थ्याचा जातीचा दाखला, पालकांचे उत्पन्न दाखला (१ लाखाच्या आतील), विद्यार्थ्याचा जन्म दाखला (इयत्ता १ली), विदयार्थ्याचा शाळा सोडलेचा दाखला, विदयार्थी पालकचे आधार कार्ड, विद्यार्थी पालकांचे ID साईज फोटोग्राफ, रेशन कार्ड (झेरॉक्स), विद्यार्थी दारिद्रयरेषेखालील असेल, तर त्यासंबंधित यादीतील अनुक्रमांक व दाखला सादर करावा. पहिलीसाठी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्याचे वय ३० सप्टेंबर २०२२ रोजी सहा वर्षे पूर्ण असावे.
प्रवेश अर्जासाठी पाचगणी इंटरनॅशनल हायस्कूल ॲन्ड ज्युनिअर कॉलेज, गणेशपेठ रुईघर, पाचगणी-
संचालक संजय घोडके 9923917973, मुख्याध्यापक तुषार आखाडे 9765377087, तन्वी घोडके 7498958153, मंगेश डोईफोडे 8007381055 यांच्याशी संपर्क साधून प्रत्यक्ष पाल्याचा जन्म दाखला व आधार कार्ड साक्षांकीत प्रत सादर केल्यानंतर प्रवेश अर्ज विनामूल्य प्राप्त करुन घेऊन सदरील अर्ज परिपूर्ण भरुन सादर करावेत.