मुंबई : दहावी उत्तीर्ण आणि आयटीआय केलेल्या तरुणांसाठी सरकारी क्षेत्रात नोकरीची मोठी संधी निर्माण झाली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (Mazagon Dock Shipbuilders Limited) कडून ट्रेड अप्रेंटिस पदांसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 जून 2025 पूर्वी अधिकृत वेबसाईट http://www.mazagondock.in वर ऑनलाईन अर्ज करावा.

कोण अर्ज करू शकतो?
या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआयचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. हे पद भारतीय नौदल, जहाज बांधणी, उत्पादन व तांत्रिक क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी मोठी संधी आहे.

वयोमर्यादा :
अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 21 वर्षे ठेवण्यात आली आहे.
अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व इ. साठी सरकारी नियमांनुसार वयात सवलत दिली जाईल.
पगार किती मिळेल?
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35,400 ते 1,12,400 रुपये वेतन दिले जाणार असून, यासोबत केंद्र शासनाच्या नियमांनुसार इतर भत्ते आणि सुविधा मिळतील.
निवड प्रक्रिया कशी होणार?
ऑनलाईन परीक्षा (संगणक आधारित चाचणी)
कागदपत्र पडताळणी
वैद्यकीय चाचणी (Health Test)
ऑनलाइन परीक्षेत यशस्वी ठरलेले उमेदवार पुढील टप्प्यासाठी निवडले जातील. अंतिम निवड वैद्यकीय चाचणीच्या आधारे केली जाईल.
अर्ज कसा करावा?
अधिकृत वेबसाईट http://www.mazagondock.in ला भेट द्या.
“भरती” (Recruitment) टॅबवर क्लिक करा.
“Mazagon Dock Shipbuilders Limited Bharti 2024” लिंकवर क्लिक करा.
अर्ज फॉर्म भरताना सर्व आवश्यक माहिती काळजीपूर्वक भरा.
आवश्यक कागदपत्रे जसे की : फोटो, स्वाक्षरी, 10वीची गुणपत्रिका, आयटीआय प्रमाणपत्र इ. अपलोड करा.
अर्ज सादर करून त्याची प्रिंटआउट सुरक्षित ठेवा.
शेवटची तारीख : 30 जून 2025
पात्र उमेदवारांनी ही संधी दवडू नये आणि अंतिम तारखेपूर्वी अर्ज करावा, असे आवाहन माझगाव डॉक शिपबिल्डर्सतर्फे करण्यात आले आहे.







