लोणी काळभोर, (पुणे) : भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसचे प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मुल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे. संविधानामुळे लोकशाहीचे आणि मानवाचे अधिकार अबाधित राहणार असल्याचे प्रतिपादन एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच संविधान दिवस साजरा करण्यात आला. यावेळी कराड बोलते होते.
यावेळी विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, डॉ. रामचंद्र पुजेरी आदी उपस्थित होते.
यापुढे बोलताना कराड म्हणाले, “देशाचे संविधान आणि त्यातील मौलिक तत्त्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये यांची सर्वांना माहिती व्हावी यादृष्टिकोनातून हा दिवस साजरा केला जातो.
२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वामध्ये संविधानाची निर्मिती करायला एक मसुदा समितीची स्थापणा करण्यात आली होती. अनेक बैठका झाल्या चर्चासत्र घडुन आली त्यानंतर मसुदा समितीकडुन सादर करण्यात आलेला मसुदा संविधान सभेकडुन २६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वीकारण्यात आला होता.”
दरम्यान, विद्यापीठात दरवर्षी संविधान दिवस साजरा करण्यात येत असतो. तसेच संविधान दिनी भारतीय संविधानाविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याकरीता दरवर्षी संपूर्ण भारतात मोठया आनंदात अणि जल्लोषात संविधान दिवस साजरा केला जात असतो.