भोर : वेळू (ता. भोर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील शिक्षक, विद्यार्थी, सरपंच, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य यांच्या समवेत संविधान गौरव दिनाचे औचित्य साधून संविधान प्रस्ताविकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
संविधानाने सर्व भारतीयांना दिलेले अधिकार व संविधानाची जनजागृती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी संविधानबाबत घोषणा देण्यात आल्या. यावेळी शालेय संविधान पुस्तकाचे प्रकाशन माजी सरपंच अमोल पांगारे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी माजी सरपंच अमोल पांगारे , माजी उपसरपंच ईश्वर पांगरे, ह.भ. प.विठ्ठल पांगरे,सुरेखा घुगरे,वैशाली सुर्यवंशी,रुपाली मुजुमल, जास्मिन पठाण उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन गुरव मॅडम, घोडे मॅडम, सणस मॅडम, थोरात मॅडम, अनभुले सर, यांनी केले. कार्यक्रमाची माहिती राजेंद्र जाधव यांनी दिली.