लोणी काळभोर, (पुणे) : भौतिक सुखवादाचा जबर प्रभाव असलेल्या आजच्या युगात सर्वच क्षेत्रात स्पर्धा वाढलेली असली तरी उत्साहवर्धक विचाराची संजीवनी स्वामी विवेकानंदाच्या द्रोणागिरीवरच शोधावी लागेल असे मत पृथ्वीराज कपूर महाविद्यालयाचे प्राचार्य सिताराम गवळी यांनी व्यक्त केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त १२ ते १९ जानेवारी दरम्यान श्री स्वामी विवेकानंद जयंती साप्त्हाचे आयोजन करण्यात करण्यात आले आहे. त्या सप्ताहाच्या उदघाटन प्रसंगी युवा दिन साजरा करण्यात आला आहे. यावेळी प्राचार्य गवळी बोलत होते.
यावेळी लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर, उपसरपंच भारती काळभोर, ग्रामपंचायत सदस्य योगेश काळभोर, गणेश कांबळे, कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका निशा झिंजुर्के, मुख्याध्यापिका पोर्णिमा शेवाळे, बाळासाहेब काळभोर, अशोक कदम, शिवाजी काळभोर, सूर्यकांत काळभोर, संतोष भोसले, पर्यवेक्षक शिंदे व एस. एस. बोरकर, ग्रामस्थ, इतर मान्यवर उपस्थित होते.
लोणी काळभोरच्या सरपंच माधुरी काळभोर यांनी विवेकानंद सप्ताहाच्या उपक्रमातून विद्यार्थ्यांची चांगली जडणघण होण्यासाठी पूरक वातावरण मिळते. त्यामूळे विज्ञानाचा आधार देत कृतीचा संस्कार विद्यार्थ्यांमध्ये घडविला जातो याबबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.
प्रमुख वक्ते ज्येष्ठ साहित्यिक सतीश कुमदाळे यांनी ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षणाचा प्रसार या विचाराची सांगड घालून स्वामी विवेकानंदांचे व स्वराज्यमाता जिजाऊ यांचे प्रेरणादायी प्रसंग विद्यार्थ्यां समोर प्रकट केले. स्वामी विवेकानंद व शिक्षण महर्षी परमपूज्य डॉ बापूजी साळुंखे यांची माहिती सांगितली.
दरम्यान, पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तसेच कन्या प्रशाला व इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेसह गावातून प्रभात फेरी काढून उत्साहाचे वातावरण तयार केले. अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनी यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्थानिक शिक्षण सल्लागार समितीचे अध्यक्ष सुभाष काळभोर यांनी भूषविले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना बोरकर यांनी तर आभार सतीश कुमदाळे यांनी मानले.