युनूस तांबोळी
शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथे मा. बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात दहावीच्या बोर्डाचा पहिला पेपर मोठ्या उत्साहात सुरू झाला. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी ताण तणाव बाजूला ठेवून परिक्षेला सामोरे यावे यासाठी शालेय गेटवरच विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
या परिक्षा केंद्रात एकूण ३५८ विद्यार्थी परिक्षेसाठी बसले आहेत. त्यांची त्या पद्धतीने आसनव्यवस्था ठरविण्यात आली आहे. जांबूत, वडनेर खुर्द, चांडोह, म्हसे बुर्दुक, टाकळी हाजी या पाच गावातील शाळांमधून विद्यार्थी परिक्षा देणार आहेत. यासाठी केंद्र प्रमुख प्राचार्य आर. बी. गावडे, उपकेंद्रप्रमुख सतीश फिरोदिया, मिलन मिसाळ हे काम पहाणार आहेत. यासाठी २८ पर्यवेक्षक परिक्षण करणार आहेत.
शाळा व्यवस्थापन समितीने विद्यार्थ्यांच्या पिण्याचे पाण्याची व्यवस्था केली आहे. परिक्षा काळात टाकळी हाजी आउटपोस्टच्या माध्यमातून संरक्षण ठेवण्यात आले आहे. परीक्षेला सामोरे जात असताना विद्यार्थ्यांनी कॅापी करू नये यासाठी विद्यालयाच्या गेट वर प्रबोधन करण्यात आले आहे. त्याबरोबर परिक्षा काळात कॉपी होण्याचे प्रकार आढळल्यास पथक तयार करण्यात आले असल्याचे गावडे यांनी सांगितले.
यावेळी सुनीता गावडे, राजेंद्र गावडे, माजी विद्यार्थी संघटनेचे दत्तात्रय मुसळे, अजय शिंदे, बाबाजी रासकर, दत्तात्रय शिंदे ,केंद्रप्रमुख सुरेश शिंदे, केंद्राध्यक्ष आर. बी. गावडे, उपप्रमुख सतीश फिरोदिया, मिलन मिसाळ व २८ इतर शिक्षक उपस्थित होते .
विद्यार्थ्यांनी परिक्षेला सामोरे जात असताना कोणताही ताण तणाव ठेवू नये. वर्षेभर केलेल्या मेहनतीच फळ तु्म्हाला मिळाले पाहिजे. या सर्व परीक्षार्थीना संस्थेकडून हार्दीक शुभेच्छा…!! सुनिता गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्या, सचिव, मा. बापूसाहेब गावडे विद्यालाय, टाकळी हाजी