दीपक खिलारे
इंदापूर : मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळेमध्ये विज्ञान दिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यार्थी-विद्यार्थीनींकडून चुंबक, उष्णता यावर आधारित तसेच विविध प्रयोगांचे सादरीकरण करत, विज्ञान शिक्षकांकडून विविध अवयव संस्थांची माहिती प्रतिकृतींचे सादरीकरण करण्यात आले. तत्पूर्वी विज्ञान गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी उपप्राचार्या सविता गोफणे म्हणाल्या की, विद्यार्थ्यांना केले.विद्यार्थी अनुकरणप्रिय असतो. त्याला नवीन माहिती आत्मसात करण्याचा ध्यास असतो. वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या अंगी जोपासणे आवश्यक असून तो वृद्धिंगत होणे ही काळाची गरज आहे. विज्ञान ज्ञानाची जिज्ञासा वाढवणारे क्षेत्र असून त्याचा आपण अभ्यास करुया असे सांगितले.
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यातील वैज्ञानिक दृष्टिकोन वाढण्यासाठी आश्रमशाळेत विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिक्षिका मनिषा जगताप यांनी सांगितले.
यावेळी मुख्याध्यापक साहेबराव पवार, प्राचार्या अनिता साळवे यांनी शिक्षकांसह विद्यार्थ्यांना राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.