उरुळी कांचन : देशाचा ७४ वा प्रजासत्ताक दिन टिळेकरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रध्वजास मानवंदना देत मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शाळा, ग्रामपंचायतींमध्येही झेंडावंदन करण्यात आले.
टिळेकरवाडी ग्रामपंचायत कार्यालय येथील ध्वजारोहण सरपंच सुभाष लोणकर यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद शाळा येथील ध्वजारोहण महात्मा गांधी विद्यालयाचे माजी प्राचार्य आदर्श शिक्षक देविदास टिळेकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. उरुळी कांचन येथील विविध कार्यकारी सोसायटीचे लक्ष्मण आबा टिळेकर यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले.
यावेळी मुख्याध्यापक गुणवंत गायकवाड, अजिता गांजाळे, भालेराव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी मलखांब, कवायत, भाषण व सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन केले होते. सर्व मुलांना खेळामध्ये पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्वांचे सत्कार करून पेन व वही भेट देण्यात आली. गावाला विविध कामांमध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व होतकरू ग्रामस्थांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी अध्यक्ष संतोष टिळेकर, हवेली तालुका राष्ट्रवादी ओ.बी.सी.सेलचे अध्यक्ष सुभाष टिळेकर, पंचायत समितीच्या माजी सदस्या संगीता टिळेकर, माजी सरपंच कमल टिळेकर, निता टिळेकर, पुष्पा टिळेकर, उपसरपंच नंदा राऊत, पोलीस पाटील विजय टिळेकर, ग्रामपंचायत सदस्य गोवर्धन टिळेकर, गणेश टिळेकर, सुशील राऊत, कल्पना टिळेकर, सुषमा टिळेकर, वैशाली चौरे, अक्षय टिळेकर, सुभाष आबा टिळेकर, विद्यार्थी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन गोवर्धन टिळेकर व गणेश टिळेकर यांनी तर सरपंच सुभाष लोणकर यांनी आभार मानले.