उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली) येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील २७ विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात असून त्यांच्या मदतीसाठी उरुळी कांचन भाजपा पदाधिकारी धावले आहेत.
पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील प्रथम आणि द्वितीय वर्ष कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी २०२१ ला परीक्षेचा फॉर्म ऑनलाइन पद्धतीने भरले होते. परीक्षेचा फॉर्म भरताना कला शाखेच्या विद्यार्थ्यांना भूगोल विषय निवडताना दोन कोड आले होते. त्यामध्ये आर्थिक भूगोल आणि पर्यावरण भूगोल असा उल्लेख केलेला नव्हता.
त्यांमुळे विद्यार्थ्यांना नेमका काय कोड आहे. हे नक्की माहिती नव्हते. नसल्याने त्यांनी कोड निवडला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक भूगोल विषय असताना, पर्यावरण भूगोलचे पेपर आले. तर ज्या विद्यार्थ्यांचे पर्यावरण भूगोल होता. त्यांनी आर्थिक भूगोल विषयाची परीक्षा २०२२ ला ऑनलाइन पद्धतीने दिली.
तर दुसरीकडे प्रथम वर्ष वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी कम्प्युटर राईज अकाउंटिंग या विषयाच्या ऐवजी जेंडर सेन्सिव्हिटीची परीक्षा दिली. अशा प्रकारे पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयातील २६ विद्यार्थ्यांनी सुमारे दीड वर्षाहूनही परीक्षा देऊन अधिक कालावधी झाला आहे. तरी, त्यांच्या गुणपत्रिकेवर गुण आले नाहीत.
त्यामुळे त्यांचा निकाल हा नापास येत आहे. दीड वर्षापासुन विद्यार्थी पायपीट करत असुन देखिल त्यांचा प्रश्न सूटलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मदतीला उरुळी कांचन भाजपा पदाधिकारी धावले असून, त्यांनी यासंदर्भात प्राचार्य बाळासाहेब भगत यांना निवेदन दिले आहे.
यावेळी पुणे जिल्हा युवती आघाडी उपाध्यक्षा पूजा सणस, उरुळी कांचन शहर अध्यक्ष अमित कांचन, युवा मोर्चा सचिव गणेश घाड़गे, साक्षी ढवळे, कार्तिक मदने, काजल खोमणे, मयूरी लोणारी, ऋतिक तुपे आणि महाविद्यालयातील असंख्य विद्यार्थी उपस्थित होते.
परीक्षा शुल्क, प्रवेश फी देण्यास उशीर झाल्यास महाविद्यालय विद्यार्थ्याकडुन १५० रुपये विलंबशुल्क आकारले जाते. त्यामुळे उरुळी कांचन परिसरातील विद्यार्थी हे सर्व सामान्य घरातील आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून विलंबशुक्ल आकारू नये, अशी मागणी यावेळी भाजपच्या वतीने करण्यात आली. या विषयासंदर्भात पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब भगत यांच्याही संपर्क करण्याचा प्रयत्न केला.
मात्र त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे फक्त पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा हा प्रश्न आहे की, फक्त उरुळी कांचन येथील पद्मश्री मणिभाई देसाई महाविद्यालयाचा आहे. ते समजू शकले नाही.
याबाबत बोलताना विद्यार्थिनी म्हणाली, गुणपत्रिकेवर गुण न आल्याने तृतीय वर्षातील प्रवेश नाकारण्यात आला आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान होत आहे. विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी त्वरित गुणपत्रिकेवर गुण द्यावे.