उरुळी कांचन, (पुणे) : शिक्षक हा समाजाचा आरसा असुन आई वडीलानंतर मुलांचे भवितव्य घडवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. विकसित देश बनविण्याची ताकद फक्त शिक्षकांच्या हातात असून शिक्षकांनी दिलेल्या ज्ञानाच्या जोरावर देशाची जडणघडण होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रदीप कंद यांनी केले.
उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कस्तुरी प्रतिष्ठान येथे पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघ संलग्न हवेली तालुका माध्यमिक संघ, हवेली तालुका शिक्षक लोकशाही आघाडी (TDF) व महिला शिक्षिका माध्यमिक संघ पुणे आयोजित तालुकास्तरीय शिक्षक गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रदीप कंद बोलत होते.
एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभागाचे प्रमुख भाऊसाहेब महाडिक (सर) यांना हवेली तालुका स्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार भाऊसाहेब महाडिक हे एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये गेले २२ वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत.
यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंनी प्राविण्य मिळवले आहे. मास्टर्स गेम्स असोशियन आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत भाऊसाहेब महाडिक यांनी तीन पदके पटकविले असून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या किर्ती कांचन, पुणे जिल्हा शिक्षक सेलचे अध्यक्ष राम प्रभू पटेकर, शिक्षक माध्यमिक लोकशाही आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष वसंतराव ताकवले, उपाध्यक्ष अशोकराव नाळे, शिक्षक लोकशाही आघाडीचे अध्यक्ष पांडुरंग पवार, क्षेत्रीय रेल्वे समितीचे सदस्य अजिंक्य कांचन, उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, सोरतापवाडीचे माजी सरपंच सुदर्शन चौधरी, सुभाष टिळेकर, माध्यमिक शिक्षण संघाचे अध्यक्ष रमेश विचारे, सचिव शरद चौधरी, रमेश पाटील, राजेंद्र बोधे, शिंदवणेचे माजी उपसरपंच संभाजी महाडिक, सोपान महाडिक, प्राचार्य सुरेश कांचन, ग्रामपंचायत सदस्य सुनिल तांबे, अमित (बाबा) कांचन,, मोहन आंबेकर, तुकाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सचिन मचाले आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी जीवन गौरव पुरस्कार अशोक नाळे यांना देण्यात आला. हवेली तालुक्यातील ५ शाळांना विविध उपक्रम राबविल्याबाबत तर १७ शिक्षकांना गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्यात आले.
प्रिंट व डिजीटल मिडीया हवेली तालुका पत्रकार संघाचे सभासद व जेष्ठ पत्रकार भाऊसाहेब महाडिक यांना तालुकास्तरावर गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान..!
एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे क्रीडा विभागाचे प्रमुख भाऊसाहेब महाडिक (सर) यांना हवेली तालुका स्तरीय गुणवंत आदर्श शिक्षक पुरस्कार पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आदर्श शिक्षक पुरस्कार भाऊसाहेब महाडिक हे एंजल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज मध्ये गेले २२ वर्ष क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्तरावर राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंनी प्राविण्य मिळवले आहे. मास्टर्स गेम्स असोशियन आयोजित राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेत भाऊसाहेब महाडिक यांनी तीन पदके पटकविले असून राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादासाहेब लांडे यांनी केले तर आभार दिलीप थोपटे यांनी मानले.