लहू चव्हाण
पाचगणी, (सातारा) : छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणेने हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती भारती विद्यापीठ गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्साहात साजरी करण्यात आली.
शालेय गाॅडस् व्हॅली हायस्कूल पासून पंचागणी येथील शिवाजी चौकापर्यंत पदयात्रा काढून चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास प्राचार्य, शालेय विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. मुलांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर व पूज्यभाव वृद्धिंगत होण्यासाठी मुलांना मार्गदर्शनपर भाषणातून शिवपराक्रमाचे धडे देण्यात आले.
दरम्यान, भारती विद्यापीठ शालेय शिक्षण विभागाच्या अध्यक्षा विजयमाला कदम (वाहिनी साहेब) यांच्या कृपाशीर्वादाने, महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री व काँग्रेसचे आमदार डॉ. विश्वजीत कदमयांच्या प्रेरणेने, संचालक एम. डी. कदम व संचालिका डॉ. अरुंधती निकम मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली प्राचार्य कुर्माराव रेपाका व सर्व विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमाची रंगत वाढवली.