सुरेश घाडगे
परंडा : एनएमएमएस या स्पर्धा परीक्षेमध्ये शहरातील बावची विद्यालयाचे २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यातील ४ विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. वैभव दत्तात्रय कोयल ( एनटी ३ प्रवर्ग जिल्ह्यात प्रथम ), ऐश्वर्या रमेश वाघमोडे, प्रसाद धनाजी भानवसे आणि अश्विनी अंगद हेळकर शिष्यवृत्ती मिळविलेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत.
तर सारथी शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयाचे १२ विद्यार्थी पात्र झाले आहे. यामध्ये वेदिका संतोष लिमकर, सुमीत पुरुषोत्तम दोरगे, सायली संजय गपाट, शिवाजीराजे चंद्रहास काळे, सार्थक संतोष बोराडे, सार्थक लक्षण होरे, धनश्री अंकुश होरे, साक्षी सुनिल वाडेकर, सार्थक हिराचंद गोडगे, भूमिका सौदागर लिमकर, साक्षी सुनिल पाटील, तनुजा संतोष पाटील या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
दरम्यान,बावची विद्यालयाचे एनएमएमएस या स्पर्धा परीक्षेत ४ विद्यार्थी व सारथी शिष्यवृत्तीमध्ये १२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अशी एकूण १६ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र झाले आहेत. एनएमएमएस धारक विद्यार्थ्यांना इ.१२ वी पर्यंत दर वर्षी १२००० शिष्यवृत्ती मिळते तर सारथी शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांना ९६०० रुपये मिळतात.
या गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांचे मार्गदर्शक पी. व्ही. डोके यांचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बिभिषण रोडगे, मुख्याध्यापिका सौ.अनिता रोडगे, नारायण खैरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच यशस्वी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणीक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.