उरुळी कांचन : उरुळी कांचन (ता. हवेली ) येथील सर्व अंगणवाडी केंद्रामध्ये स्वस्थ बालक बालिका स्पर्धा बुधवारी (ता.२१) मोठ्या उत्साहात संपन्न झाली आहे. या स्पर्धेत बालकांनी उत्स्पुर्त सहभाग नोंदविला आहे.
उरुळी कांचन येथील इरिगेशन कॉलनीतील अंगणवाडीत स्वस्थ बालक-बालिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राजेंद्र बगाडे यांनी स्वस्थ बालकांसाठी बक्षिसे दिली होती. या बक्षिसांचे बालकांना वितरण शुभम वलटे व प्रियंका जगताप यांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन पर्यवेक्षिका शांता शिद यांच्या मार्गदर्शनाखाली अंगणवाडी सेविका सुनंदा खेडेकर यांनी केले होते.
उरुळी कांचन येथील आश्रमरोड अंगणवाडी केंद्राला उपमुख्य कार्यकारी अधीकारी गिरासे यांनी भेट दिली व पालकांना मार्गदर्शन केले. यावेळी बाल विकास प्रकल्प अधिकारी मिलम भुमकर मॅडम, विस्तार अधिकारी गुंजाळ, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर ,सुभाष बगाडे, उरुळी कांचन येथील २२ अंगणवाडी सेविका आणि २२ मदतनीस उपस्थित होत्या.
दरम्यान, महिला आणि बाल विकास मंत्रालयामार्फत चालविण्यात येणाऱ्या सामुदायिक बाल विकास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केली आहे. याअंतर्गत बालकांच्या आरोग्य व पोषणाबाबत जागरूकता व संवेदनशीलता वाढविण्यासाठी जिल्ह्यात ‘स्वस्थ बालिका बालिका स्पर्द’ अभियान राबविण्यात येत आहे. या स्पर्धेचा उद्देश असा आहे कि, ० ते ६ वयोगटातील पोषित बालकांमधील पोषण ओळखणे व त्यांची देखभाल करणे, तसेच बालकांच्या आरोग्य व पोषणाबाबत कुटुंब व समाजाला जागरूक करणे हा आहे.