युनूस तांबोळी,
शिरूर : जिल्हा परिषदेची आदर्श शाळा असलेली वाबळेवाडी येथील शाळेतील तब्बल २७ विद्यार्थ्यांची एनएमएमएस मध्ये निवड झाली आहे. शाळेचा १०० टक्के निकालासह शाळेने उज्वल यशाची परंपरा कायम राखत दैदीप्यमान यश संपादन केले आहे.
राज्यातील एक आदर्श व उपक्रमशील शाळा म्हणून वाबळेवाडी शाळा नावारुपाला आली आहे. या शाळेतील ४१ विद्यार्थी एनएमएमएस परीक्षेमध्ये बसले होते. त्यातील सर्व विद्यार्थी परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत तब्बल २७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी ४८ हजार शिष्यवृत्ती मिळणार असून असे एकूण १२९६००० रुपये या सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून मिळणार आहेत.
या परीक्षेतील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तज्ञ जयश्री पलांडे आणि सुनिल पलांडे यांनी मार्गदर्शन केले आहे. सदर परीक्षेसाठी कोरोनाचे वातावरण असताना सुद्धा विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये कसलाही खंड न पडू देता अविरत शिक्षण चालू ठेवणाऱ्या पलांडे दाम्पत्याने या मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहे.
निकाल जाहीर होताच ज्या विद्यार्थ्यांची निवड झाली त्यांचा शाळेकडून शालेय व्यवस्थापन कमिटीच्या अध्यक्ष सुरेखाताई वाबळे, शिक्रापूर ग्रामपंचायतीचे सदस्य प्रकाश काका वाबळे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक विठ्ठल पवार, उपमुख्याध्यापिका शरीफा तांबोळी, माजी उपसरपंच भगवान वाबळे, ज्येष्ठ नागरिक केशवराव वाबळे, तंटामुक्त समिती अध्यक्ष अंकुश वाबळे व सर्व शिक्षक वृंद कार्यक्रमाला उपस्थित होते.
दरम्यान, वाबळेवाडी शाळेच्या या घवघवीत यशाबद्दल केंद्रप्रमुख राजेंद्र टिळेकर, विस्तार अधिकारी वंदना शिंदे, गटशिक्षणाधिकारी अनिल बाबर यांनी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक केले आहे. तर एनएमएमएस मध्ये निवड होऊन शाळेला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
गुणवत्ता यादीत आलेले विद्यार्थी खालीलप्रमाणे (कंसात गुण)
पार्थ बापू डफळ (146),प्रणव प्रकाश मांढरे(140),अथर्व रवींद्र डफळ (139),अपेक्षा निलेश मासळकर (136), हर्षदा जितेंद्र जोशी (130),हर्षदा प्रकाश वाबळे (129),अथर्व गणेश टेमगिरे (123),मयुर राजेंद्र गोकुळे (122),श्रेया बाबाजी राऊत (121),अस्मिता ज्ञानेश्वर तांबे (120),संस्कृती शंकर पावसे (117),सृष्टी अविनाश शेवाळे (117),यशराज इंगळे (116),पायल अरुण ठोंबरे (116),समता गोकुळ मंडलिक (115),किरण भाऊसाहेब तांबे (115),अनुष्का मंगेश खैरे (113),स्नेहा सुनिल जाधव (110),मैथिली दत्तात्रय बारगळ (109),ओम महारुद्र काळे (108),ओम दिनेश पुजारी (107),नम्रता नामदेव राऊत (105),सृष्टी संतोष थिट्टे (103),सिद्धेश राजकुमार गवारी(102),ओम दयानंद कोरे (95),जीवन नितीन नर्के (94),यश वसुदेव जाधव (92),