पुणे: राज्य शासनाकडून परदेशी शिक्षणासाठी भटक्या आणि विमुक्त जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्गातील, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीच्या या शिष्यवृत्तीला पात्र ठरण्यासाठी वर्षातून दोनदा परीक्षा घेतल्या जातात. त्यासाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ३० जानेवारीपर्यंत परीक्षेसाठी अर्ज करू शकतात. विद्यार्थी ज्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेणार आहेत, ती परदेशातील शिक्षण संस्था जागतिक क्रमवारीत २०० क्रमांकांच्या आतली असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागास वर्ग आणि खुल्या प्रवर्गातील ८ लाखांच्या आत उत्पन्न असलेल्या विद्यार्थ्यांनाच परदेशात जाऊन शिक्षण घेता येणार आहे. या शिष्यवृत्ती योजनेसाठी राज्य सरकारकडून घेण्यात येणारी पात्रता परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे.
शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम मिळणार…
दरम्यान, परदेशात उच्च शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणांची पारख व्हावी व त्याला संधी मिळावी, या हेतूने परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्तीची योजना सुरू केली आहे. या शिष्यवृत्तींतर्गत विद्यापीठाने प्रमाणित केलेल्या शिक्षण शुल्काची पूर्ण रक्कम विद्यार्थ्यांना दिली जाते.