सागर जगदाळे
Ambedkar Jayanti 2023 भिगवण : आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे अवचित्य साधून रोटरी क्लब भिगवन तर्फे भिगवण येथील आम्रपाली बौद्ध विहार येथे येथे विद्यार्थ्यांना 250 वह्यांचे वाटप करण्यात आले..
शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क…!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, “व्यक्तीला अस्तित्वाची, क्षमतांची आणि सामर्थ्याची जाणीव करून देते ते शिक्षण होय…तसेच शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि हा अधिकार कुणालाही नाकारता येणार नाही, असे शिक्षणाबाबत असे त्यांचे मत होते…त्यांची शैक्षणिक योग्यता, विद्वत्ता आणि प्रतिभा एवढी व्यापक आणि अतिभव्य आहे की त्यांना ‘जगातील सर्वात बुद्धिमान व्यक्ती’ तसेच ‘सिम्बॉल ऑफ नॉलेज‘ म्हणून ओळखले जाते… त्यांचे हेच विचार पुढील पिढीसाठी रुजवणे गरजेचे आहे व शिक्षणाची आवड निर्माण व्हावी म्हणून परिसरातील मुलांना रोटरी क्लब ऑफ भिगवन तर्फे वह्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ भिगवन चे अध्यक्ष डॉ.अमोल खानावरे,रियाज शेख ,संजय खाडे ,खजिनदार संतोष सवाने, डॉ. अमित खानावरे, औदुंबर हुलगे,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पुणे जिल्हा अध्यक्ष विक्रम शेलार तसेच अमर बौद्ध युवक संघटनेचे रोहित शेलार, मंगेश शेलार,सनी शेलार, नाना गायकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाचे व वह्यांचे नियोजन सचिन बोगावत,बिल्ट ग्राफिक्स चे बाळासाहेब सोनवणे,गांधी साहेब,डॉ शैलेश दोशी,डॉ विशाल कोठारी,प्रदीप ताटे,अॅड. रुपेश झाडे यांनी केले. अमर बौद्ध युवक संघटनेतर्फे रोहित शेलार यांनी आभार मानले.