पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका संचलित पाटीलनगर टाळगाव चिखली जगदगुरु संत तुकाराम महाराज संतपीठासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. पाल्याच्या प्रवेशासाठी पालकांना येत्या १८ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची संधी आहे. जगद्गुरु संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेज, पाटीलनगर टाळगाव चिखली येथे शैक्षणिक वर्ष २०२५-२०२६ मध्ये नर्सरी वर्गासाठी विद्यार्थी १६० इतकी विद्यार्थी संख्या निश्चित करण्यात आली आहे. यात २५ टक्के जागा आरटीईसाठी आरक्षित ठेवण्यात आल्या आहे. तर, उर्वरित १२० जागांसाठी प्रवेश अर्ज मागविण्यात येत आहेत.
नर्सरी वर्गाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रथम संतपीठ शाळेच्या संकेतस्थळावर ४ डिसेंबरपासून फॉर्म ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आले आहेत. इच्छुक विद्यार्थी नाव नोंदणीचे फॉर्म भरण्याची अंतिम तारीख १८ डिसेंबर २०२४ राहील. पात्र अर्जामधून जागांच्या उपलब्धतेनुसार सोडत पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करण्यात येईल. या शाळेमध्ये प्रवेश निश्चित विद्यार्थांसाठी पूर्व प्राथमिक वर्गासाठी प्रती विद्यार्थी २३ हजार शैक्षणिक शुल्क ठरविण्यात आले आहे. तसेच, शैक्षणिक साहित्याचा खर्च वेगळा आकारण्यात येईल. त्याचप्रमाणे पूर्व प्राथमिकचे ज्युनिअर केजी ते इयत्ता आठवीपर्यंतच्या रिक्त जागा व वार्षिक शुल्कबाबतचा तपशील संतपीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.