विशाल कदम
जिंती : प्रत्येकाच्या आयुष्यातील एक सुंदर आणि निर्मळ आठवण म्हणजेच “बालपण” होय. बालपणीची आठवण आली की, प्रत्येक व्यक्ती हा आपल्या भूतकाळात जातो आणि बालपणीच्या सर्व आठवणीचे एक एक करुन डोंगर पोखरू लागतो. मग बालपण हे श्रीमंती मध्ये गेलेले असो किंवा गरिबी मध्ये, बालपणीच्या आठवणी ह्या अप्रतिम असतात. मुलगा असो किंवा मुलगी कडू – गोड, चांगल्या – वाईट आठवणींनी भरलेले असते, ते म्हणजे प्रत्येकाचे बालपणच. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच बालपणाचा आनंद घ्या, असा सल्ला दत्तकला शिक्षण संस्थेच्या सचिव माया झोळ यांनी यांनी दिला.
भिगवण (ता. इंदापूर) येथील दत्तकला शिक्षण संस्थेमध्ये आज सोमवारी (ता.१४) बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव माया झोळबोलत होत्या. यावेळी प्राचार्या नंदा ताटे, प्राचार्या सिंधू यादव, विभाग प्रमुख प्रा. धर्मेंद्र धेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना माया झोळ म्हणाल्या कि, बालपणीची दिवस खूप मनाला आनंद देणारे असतात. जगातील प्रत्येक व्यक्तीला त्याचे बालपण हे आठवतेच. या सृष्टीवर अशी कोणतीही व्यक्ती बघायला मिळणार नाही की, त्या व्यक्तीला आपले बालपण आठवत नसेल. संपूर्ण जीवनामध्ये बालपण हे एकदाच मिळते. म्हणून सर्वजण आपापल्या पद्धतीने बालपणीच्या आठवणी जपून ठेवत असतात. बालपणीच्या खूप साऱ्या आठवणी आपण जपून ठेवल्या आहेत. बालपणीची आठवण आली की, बालपण पुन्हा हावे हावेसे वाटते. म्हणून म्हणतात की, प्रत्येकाच्या जीवनातील सुंदर क्षण असतात ते बालपणीच असतात.
यावेळी स्वातंत्र्य भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी नेहरू यांचा पोशाख परिधान केला होता. तसेच विद्यार्थ्यांनी विज्ञान्याचे प्रयोग यावेळी करून दाखविले. तेव्हा शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांचे कौतुक करून शाबासकी देण्यात आली.
यावेळी विभाग प्रमुख प्रा. संगीता खाडे. प्रा.मोनिका केसकर, सचिन कांबळे, सुनिता नेटके, सारिका केकान, अश्विनी देवकर, रघुनाथ झोळ, शीतल खोमणे, शुभांगी दराडे, ज्योती झोरे , विजयालक्ष्मी कापुरे, प्रताप कडू, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रा.निलेश पवार यांनी मानले.