जनार्दन दांडगे
उरुळी कांचन, (पुणे) : कलाअविष्कार फाउंडेशन पुणे महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाळेतील ८ विद्यार्थी बक्षीसपात्र ठरले आहेत.
कलाअविष्कार फाउंडेशन पुणे महाराष्ट्र आयोजित राज्यस्तरीय चित्रकला व रंगभरण स्पर्धेचे आयोजन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर येथे २५ नोव्हेंबर २०२२ ला करण्यात आले होते. या स्पर्धेत इयत्ता पहिली ते नववीतील प्राथमिक व माध्यमिक विभागातून एकूण ३७८ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर असून या स्पर्धेत प्राथमिक विभागातून ४ व माध्यमिक विभागातून ४ विद्यार्थी हे बक्षीसासाठी पात्र ठरले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ महात्मा फुले सभागृह फातिमानगर या ठिकाणी पार पडला
प्राथमिक विभागातील विजेत्याचे नाव, कंसात इयत्ता, बक्षीस, गट
ओम भालचंद्र हंगे, (दुसरी) (स्केटिंग, ट्रॉफी, प्रमाणपत्र), अमृता सुनील टिळेकर, (दुसरी) (गोल्ड मेडल), प्रांजल विजय गवळी (दुसरी) (सिल्वर मेडल) सर्वजन गट ब, दुर्वा गणेश अभंगराव (चौथी) (गोल्ड मेडल) गट क,
माध्यमिक विभाग ई गट
मोनिका सचिन देवकते (आठवी) स्मार्ट वाच, ब्रांझ मेडल, आरती विलास हजारे, (नववी) गोल्ड मेडल, प्रमाणपत्र, निशा गोपीनाथ कुदळे (नववी), सिल्वर मेडल, पल्लवी कल्याण राठोड (नववी), सिल्वर मेडल,
स्पर्धेचे आयोजक व कलाअविष्कार फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप सुतार, उपाध्यक्ष प्रितम मिसाळे, प्रमुख पाहुणे आर्ट बिट्सचे फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष पांचाळ, अक्षय अग्निहोत्री उपस्थित होते.
दरम्यान, यावेळी विद्यार्थी व शाळा यांचा यावेळी गौरव करण्यात आला. तसेच प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सरिता राऊत तसेच माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका ज्योती भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हि स्पर्धा पार पडली होती. यावेळी कला शिक्षिका हर्षला बांबळे व कलाशिक्षक अमीर मानियार सर यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्था अध्यक्ष, सर्व पदाधिकारी व मुख्याध्यापकांनी अभिनंदन केले.