अजित जगताप
वडूज : जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व प्रचार करणाऱ्या चिमुकल्यांनी सिद्धेश्वर कुरोली ता खटाव येथे चांगला संदेश दिला आहे.
खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली या ठिकाणी बुद्ध विहार आहे. या बुद्ध विहारांमध्ये त्रिसरण पंचशील व बौद्ध गाथा ग्रहण केल्या जातात. विशेष म्हणजे महिलावर्ग व चिमुकली बालक या संस्कार कार्यक्रमात सहभागी होतात.
प्रत्येक दिवशी सायंकाळी बुद्ध- वंदना धम्म- वंदना संघ- वंदना घेतली जातात. बौद्ध अनुयायी प्रामाणिकपणे बौद्ध धर्माचे आचरण करतात. बौद्धाचार्य अधिक राव कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संतोष भंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप, अजित अण्णा कंठे यांच्या उपस्थितीमध्ये सिद्धेश्वर कुरोली येथील बौद्ध मंदिरात छोटेखानी प्रवचन देण्यात आले.
यावेळी सानिया कांबळे, श्रुती कांबळे, हर्षद कांबळे, सोना कांबळे, श्रुती दणाणे, ईर्षा दणाणे, बोधिका भंडारे व प्रणाली मिसाळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बौद्ध धर्मीयांच्या विविध कार्यक्रमात सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन सहभागी होत आहेत. त्यामुळे सिद्धेश्वर कुरोली गावात राष्ट्रीय एकात्मता व बंधुभाव वाढीस लागला आहे. ही चांगली आणि परिवर्तनवादी गोष्ट आहे. या ठिकाणी बालपणापासूनच समता- स्वातंत्र्य- बंधुत्व याची शिकवण देत असल्याने भगवान गौतम बुद्धांचा अहिंसावादी मार्ग हा जीवनातील यशस्वी मार्ग ठरू लागला आहे.असा अनुभव अनेकांनी व्यक्त केला आहे.