लोणी काळभोर: एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीला अपॉर्च्युनिटी इंडियाच्या सहकार्याने फ्रँचायझी इंडियातर्फे स्टार इलेक्ट्रिकल व्हेईकल (EV) इन्स्टिट्यूशन अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले. एमआयटी स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड सायन्सचे अधिष्ठाता प्रा. डॉ. सुदर्शन सानप यांनी नुकतेच बॉम्बे एक्झिबिशन सेंटर नेस्को मुंबई येथे इंडियन EV पुरस्कार २०२२ कार्यक्रमात ईव्ही आणि मोबिलिटी क्षेत्रासाठी प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारला.
एमआयटी एडीटी विद्यापीठाने फ्रँचायझी इंडियाचे अध्यक्ष श्री गौरव मार्या, प्रसिद्ध बॉलीवूड अभिनेता श्री अली खान यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांच्यासोबत ईव्ही कार्यक्रम समन्वयक प्रा. शशांक गावडे, डॉ. संदीप थोरात, डॉ. अनिलकुमार साठे, प्रा. सिद्धार्थ साळवे आदी उपस्थित होते.
उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करत एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष आणि कुलगुरू प्रा.डॉ.मंगेश कराड म्हणाले, की ऑटोमोटिव्ह उद्योगातील आजच्या बदलाचा विचार करून इलेक्ट्रिकल व्हेईकल डोमेनमध्ये विद्यापीठाच्या योगदानाचे प्रतीक हा पुरस्कार आहे. सध्या देशात ईव्ही तंत्रज्ञानावर आधारित उत्पादने विकसित आणि उत्पादित केले जात आहेत. भविष्यात याची प्रचंड संभाव्य बाजारपेठ उभी राहणार आहे.
याचा फायदा घेण्यासाठी आणि शैक्षणिक क्षेत्राद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षण आणि उद्योजकतेच्या संधी निर्माण करण्यासाठी आमच्या विद्यापीठात ईव्ही तंत्रज्ञानाचे शिक्षण आणि प्रशिक्षण दिले जात आहे. यासाठी आम्ही अभ्यासक्रम ही चालवतो.
डॉ. सुदर्शन सानप म्हणाले, “एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणे आणि विद्यापीठाच्या वतीने प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारणे हा माझ्यासाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योग आणि शैक्षणिक संस्थांकडून इलेक्ट्रिक मोबिलिटीमध्ये उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेला प्रोत्साहन देण्यासाठी नामांकन मागवण्यात आले होते.
या पुरस्कार कार्यक्रमाचे उद्दिष्ट उद्योजक आणि शैक्षणिक संस्थांना संसाधनांमध्ये प्रवेश मिळवून देण्यास सक्षम करणे आणि बाजारपेठेला पर्यावरण-स्वच्छ उर्जेकडे वळवण्याचे प्रमुख खेळाडू म्हणून परिभाषित करणे हा होता.
पुरस्कारांमध्ये इलेक्ट्रिक वाहन, ईव्ही तंत्रज्ञान, ईव्ही डिझाइन, ईव्ही चार्जर निर्माती, ईव्ही बॅटरी, ईव्ही ऑटो पार्ट, ईव्ही फायनान्स, ईव्ही इन्फ्रास्ट्रक्चर, ईव्ही बिझनेस आणि ईव्ही लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कारांचा समावेश होता.
एमआयटी एडीटी युनिव्हर्सिटीने स्टार ईव्ही संस्था पुरस्कार आणि स्टार ईव्ही एज्युकेशनिस्ट श्रेणीमध्ये नामांकन दाखल केले होते. या कार्यक्रमात एमआयटी आर्ट डिझाईन आणि टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीने स्टार ईव्ही इन्स्टिट्यूशन अवॉर्ड जिंकला.
एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट च्या संचालिका डॉ. सुनिता कराड, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अनंत चक्रदेव आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. महेश चोपडे यांनी ई व्हीं टीमचे अभिनंदन केले.