पुणे : राजकीय वरदहस्त असलेल्या दौंड तालुक्यातिल चार अनाधिकृत शाळांना पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी किसन भुजबळ यांनी कुलूप ठोकले. मागील अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या शाळा अनाधिकृत सुरू होत्या असे सांगण्यात येत आहे. दरम्यान शाळांवर दंडात्मक कारवाई देखील केली गेली आहे.
या प्रकारामुळे संबंधीत शिक्षणमाफियामध्ये खळबळ उडाली असून पुढील कारवाई टाळण्यासाठी त्यांची धांदल उडाली आहे.
जिजाऊ एज्युकेशन सोसायटीची अभंग शिशुविहार बालविकास ज्ञान मंदिर, सौ. प्रतिभाताई गायकवाड प्रतिष्ठान या संस्थेचे क्रेयाॅन्स इंग्लिश प्राइमरी स्कूल, कासुर्डी, प्रभाकर एज्युकेशन सोसायटी या संस्थेची ज्ञानप्रभा इंग्लिश मीडियम स्कूल, दौंड तसेच या संस्थेने प्राथमिक व माध्यमिक ह्या दोन्ही शाळा अनाधिकृतरित्या श्री मंगेश स्कूल ह्या ठिकाणी स्थलांतरित केली, ती शाळा या सर्वांचा कारवाई केलेल्या शाळांमध्ये समावेश आहे. तेथील मुलांना दुसऱ्या शाळांमध्ये समाविष्ट केले आहे.