उरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन येथील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शाळेचा ‘शूज’ न घातल्याच्या कारणावरून चार मुलांना शिक्षिकेने बेदम मारहाण केल्याची घटना पुढे आली आहे. मारहाण झालेली चारही मुले भेदरली असून झालेला प्रकार पालकांना समजल्याने शाळेबद्दल संतापाचे वातावरण आहे.
लोणी काळभोरशी ‘नातं’ सांगणाऱ्या वरील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत काही दिवसापूर्वी थकीत ‘फि’ च्या कारणावरून विद्यार्थ्यांची छळवणूक केल्याचा प्रकार शिक्षण अधिकाऱ्याकडे गेला होता. त्यातच वरील प्रकार घडल्याने उरळी कांचन येथील संबंधित शाळेची वरिष्ठ पातळीवर चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
या शाळेतील चार ही मुलांना नवीन शूज आहेत. मात्र नवीन शूज हे पायाला टोचून दुखापत झाली आहे. त्यामुळे संबंधित मुले हि मागील वर्षीचेच शूज वापरत होते. शिक्षेकेला मुलांनी हि माहिती दिली.परंतु संबंधित शिक्षिकेने काहीच ऐकून घेतले नाही. व मुलांना मारहाण केली. मुलांनी घडलेली बाब घरी जाऊन पालकांना सांगितली. त्यानुसार पालकांनी संबंधित शाळा व शिक्षेकेवर संताप व्यक्त करून करवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, मुलांना शिक्षण देण्यासाठी शासनाच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न केले जातात. विविध उपक्रमांच्या माध्यमातून मुलांना शिक्षण देण्यासाठी प्रोत्साहान करीत आहेत. तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील शिक्षकाविषयीची भिती नष्ट करण्यासाठी शासनाने विद्यार्थ्यांना मारहाण करण्यास व अपमानास्पद वागणूक देण्यास बंदी केली असताना देखील वरील प्रकार घडला आहे. याबाबत उरुळी कांचनसह परिसरात पालकांनी संताप व्यक्त केला आहे.