मुंबई : फूड डिलिव्हरी पार्टनर झोमॅटोने मार्केटमध्ये आपला चांगलाच दबदबा निर्माण केला आहे. आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत झोमॅटोचा नफा वार्षिक आधारावर तब्बल 126 पटीने वाढला आहे. यापूर्वी दोन कोटी असणारा नफा आता 253 कोटींवर गेला आहे. हा आकडा फक्त चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतील असल्याची माहिती दिली जात आहे.
झोमॅटो कंपनीने आपल्या ग्राहकांना खरेदीपासून ते राहण्यापर्यंतच्या सेवा देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी कंपनीने एक ऍप देखील सुरु केले आहे. या ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना जेवण, चित्रपट तिकीट बुकिंग, कार्यक्रम बुकिंग इत्यादींचा समावेश असणाऱ्या सुविधा दिल्या जाणार आहे. दरम्यान, झोमॅटोच्या शेअर्सने शुक्रवारी (दि.2) मोठी उसळी घेतली. भारतीय शेअर बाजारात घसरत होत असतानाच झोमॅटोच्या शेअर्समध्ये तेजी पाहिला मिळाली.
पहिल्या तिमाहीचे निकाल समोर येताच शेअर बाजारातही कंपनीचे शेअर 278.7 रुपयांवर पोहोचले आहे. जून तिमाहीतील चांगल्या नफ्यानंतर शेअर्समध्ये तेजी दिसून आली. याचा फायदा झोमॅटोचे शेअर असणाऱ्यांनाही होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.