मुंबई : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. या शेअर मार्केटमध्ये स्टॉकच्या माध्यमातून परतावाही चांगला मिळतो. असे असताना आता एका कंपनीचा IPO लवकरच आणला जाणार आहे. यातून फक्त शॉपिंगच नाहीतर कमाईही केली जाणार आहे.
विशाल मेगा मार्ट असे या कंपनीचे नाव आहे. देशातील अनेक शहरांमध्ये त्यांचे सुपरमार्केट आहेत. आता ही सुपरमार्केट कंपनी आपला IPO घेऊन येत आहे, ज्याच्याशी संबंधित अनेक माहिती समोर आली आहे. कंपनी बाजारातून 8000 कोटी रुपये उभारण्याच्या तयारीत असून, 11 डिसेंबरपासून गुंतवणूकदारांना त्यासाठी बोली लावण्याची संधी मिळणार आहे. सुपरमार्केट क्षेत्रातील मोठी समजली जाणारी विशाल मेगा मार्ट आता शेअर बाजारात पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.
कंपनीचा IPO 11 डिसेंबरला सुरू होणार असून, गुंतवणूकदार 13 डिसेंबरपर्यंत त्यात पैसे गुंतवू शकतील अँकर गुंतवणूकदारांसाठी, हा IPO एक दिवस आधी म्हणजेच 10 डिसेंबर रोजी उघडेल. कंपनीने गुरुवारी या संबंधित काही माहितीही जारी केली आहे. त्यानुसार, विशाल मेगा मार्केटच्या आयपीओचा आकार 8,000 कोटी रुपये असण्याची शक्यता आहे.