नवी दिल्ली : सध्या अनेक व्यवहार करताना ऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिले जाते. त्यानुसार, अनेक ऍप्स देखील आहेत त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गुगल पे, फोन पे, पे-झॅप, क्रेड यांसारखी माध्यमं आहेत. यातून ऑनलाईन पेमेंट केले जाते. पण तुम्ही जर गुगल पे वापरत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी असणार आहे.
एका अहवालानुसार, भारतात डिजिटल पेमेंट करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच गुगल पे आणि इतर डिजिटल कंपन्यांचे महत्त्व वाढले आहेत. पण असे असतानाच ऑनलाईन पेमेंट प्लॅटफॉर्ममधील गुगल पे हे अॅप अमेरिकेत बंद होणार आहे. याबाबत Google Pay कडून महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये पुढील महिन्यात अर्थात 4 जूनपासून अमेरिकेत गुगल पे ची सेवा बंद होणार आहे.
अमेरिकेत Google Pay ॲप बंद करण्याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीला Google Wallet चा वापर वाढवायचा आहे. तसेच, कंपनीला आपल्या युजर्ससाठी ऑनलाईन पेमेंट सुलभ करायचे आहे. याच कारणामुळे गुगल पे ॲप बंद करत आहे. पण भारतात याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचेही सांगण्यात येत आहे. त्यामुळे आपण आपले व्यवहार जसे पूर्वी करत होतो, तसेच आताही करता येणार आहे.