Union Budget : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर मोदी 3.0 सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असणार आहे. त्यामुळेच यावेळच्या अर्थसंकल्पाकडे सर्व देशाचे लक्ष लागून आहे. काय महागणार आणि काय स्वस्त होणार? यासाठी अर्थसंकल्पाकडे डोळे लावून बसले आहेत. यावेळी सरकारकडून शेती, तसेच शेतीपुरक क्षेत्रासाठी 1.52 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे.
केंद्र सरकारकडून 20 लाख तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली आहे. अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी उच्च शिक्षणासाठी 10 लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली. कर्मचाऱ्यांमध्ये महिलांचा सहभाग वाढवणं याला प्राधान्य असेल, अशी घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
काय होणार स्वत?
- सोनं, चांदी स्वस्त होणार
- मोबाईल हँडसेट
- मोबाईलचे सुटे भाग
- मोबाईल चार्जरच्या किंमती 15 टक्क्यांनी कमी होणार
- पोलाद, तांबे उत्पादनावरील प्रक्रियेवर करसवलत
- कॅन्सरवरची औषधे
- सोलार सेट स्वस्त होणार
- लिथियम बॅटरी स्वस्त
- चामड्यांपासून बनणाऱ्या वस्तू
- पीवीसी फ्लेक्स बॅनर
- इलेक्ट्रीक वाहने स्वस्त होणार
काय होणार महाग?
- प्लास्टीक उत्पादने महाग होणार
- प्लास्टीक उद्योगांवर करांचा बोझा वाढणार