एनपीसीआयने नवीन नेट बँकिंग नियमांमध्ये बदल केले आहेत. आजपासून (1 फेब्रुवारी) हे नवीन नियम लागू होतील. हे बदल ऑक्टोबर 2023 मध्ये जाहीर करण्यात आले होते. हा बदल आयएमपीएस म्हणजेच तात्काळ पेमेंट सेवेसाठी आहे. एनपीसीआयच्या परिपत्रकानुसार, ग्राहक लाभार्थी न जोडता थेट 5 लाख रुपये एका बँकेतून दुसऱ्या बँकेत पाठवू शकतील.
फंड ट्रान्सफर कसा कराल?
1 मोबाइल बँकिंग ॲपवर जावं.
2 ‘फंड ट्रान्सफर’ विभागावर क्लिक करा.
3 फंड ट्रान्सफरसाठी आयएमपीएस पर्याय निवडा.
4 पाठवणाऱ्याचा मोबाईल नंबर द्या आणि नंतर लाभार्थी बँकेचे नाव निवडा. विशेष म्हणजे, खाते क्रमांक किंवा आयएफअससी टाकण्याची आवश्यकता नाही.
5 तुम्हाला ट्रान्सफर करायची असलेली रक्कम 5 लाख रुपयांच्या मर्यादेत नमूद करा.
6 आवश्यक तपशील दिल्यानंतर, कन्फर्म वर क्लिक करा.
7: वन-टाइम पासवर्ड ओटीपी मिळाल्यानंतर व्यवहार पूर्ण करा
सर्व बँकांना सूचना
नियामक मंडळाच्या सर्व सदस्यांना 31 जानेवारीपर्यंत मोबाइल क्रमांक आणि बँकेतून आयएमपीएस करण्यासाठी नवीन नियम लागू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आयएमपीएस सेवेमध्ये २४ तास फंड ट्रान्सफर सुविधा उपलब्ध आहे. ही ऑनलाइन बँकिंग खाते निधी हस्तांतरण सुविधा आहे. या सुविधेमुळे युझर्स 5 लाख रुपयांपर्यंत आयएमपीएस करू शकतात. याचा अर्थ वापरकर्त्यांना निधी हस्तांतरित करण्यासाठी मोबाइल नंबर, बँक खाते, आयएफएससी कोड यासारखे इतर तपशील देण्याची आवश्यकता नाही.
अर्थमंत्री निर्मला सीतरमण यांनी आज अंतरिम बजेट सादर केलं. कररचनेत कोणताही बदल या अर्थसंकल्पात नाही. त्यामुळे आता करदात्यांना जुलैमध्ये सादर होणाऱ्या बजेटची वाट पाहावी लागणार आहे. मध्यमवर्गाला स्वतःचं हक्काचं घर घेण्यासाठी योजना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आपल्या भाषणात जाहीर केली. युवा, गरीब, महिला आणि शेतकरी वर्गासाठी योजनांची घोषणा सीतारमण यांनी केली. 2047 पर्यंत भारताला विकसीत भारत करण्याचं उद्दीष्ट ठेवण्यात आलंय.