मुंबई : सध्या शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. कारण, योग्य शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास यातून चांगला परतावा मिळू शकतो. असे असताना आता पुढील आठवड्यात शेअर बाजारात टॉलिन्स टायर्स ही कंपनी आपला IPO खुला करणार आहे. ही टायर उत्पादक कंपनी आपल्या आयपीओच्या माध्यमातून 230 कोटी रुपये उभारणार आहे.
प्रसिद्ध कंपनी टॉलिन्स टायर्सचा आयपीओ पुढील आठवड्यात खुला केला जाणार असल्याने कंपनी आता या IPO च्या माध्यमातून प्रत्येकी 5 रुपये दर्शनी मूल्याचे 10,176,992 शेअर मार्केटमध्ये आणणार आहे. यापैकी 200 कोटी रुपयांचे 8,849,558 नवीन शेअर्स जारी करणार आहे. तर या आयपीओच्या माध्यमातून 30 कोटी रुपयांचे 1,327,434 शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे उपलब्ध असणार आहे.
टॉलिन्स टायर्स आयपीओची किंमत निश्चित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यात 215-226 रुपये अशी किंमत असणार आहे. हा IPO किरकोळ गुंतवणूकदारांसाठी उघडण्यापूर्वी, 6 सप्टेंबर रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.